‘माझे सध्या वाईट दिवस’ : इंदुरीकर महाराज

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – मागच्या काही दिवसात इंदुरीकर महाराज त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी आपल्या विधानांवर प्रतिक्रिया देत माझे सध्या वाईट दिवस आहेत. चांगले काम करताना त्रास होतोय, असे म्हटले आहे. बीडमधील एका कीर्तनात बोलत असताना त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्या ठिकाणी महाराजांना पाठिंबा देणारे बॅनर्स दिसले आहेत.

बीडमधील कड्याजवळच्या कुंभारवाडा येथे इंदुरीकरांचे आज दुपारी कीर्तन आयोजित केले गेले होते. त्यावेळी ते त्यांनी केलेल्या विधानांवर बोलत होते. सध्या माझे वाईट दिवस चालले असून चांगले काम करताना एवढा त्रास होतो. तसेच मला या विषयावर काहीही बोलायचे नसल्याचेही महाराजांनी म्हटले आहे. दरम्यान काही लोकांच्या हातात ‘आय सपोर्ट इंदुरीकर’, ‘महाराज आम्ही तुमच्यासोबत आहोत’ अशा लिहिलेले फलक दिसून आले.

मागील काही दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराजांनी स्त्रीसंग करण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यावर त्यांना अहमदनगरच्या PCPNDT समितीकडून नोटीस पाठवली असताना काही लोकांनी त्यांच्या या विधानाचा निषेध केला. त्यामुळे आता इंदुरीकर महाराज चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

त्यांच्या वादग्रस्त विधानानंतर युट्यूबवाले आणि कॅमेरावाले माझ्या मागे लागलेत. आज इंदुरीकर संपवायला निघालेत, असे इंदुरीकर महाराज म्हणाले. त्यामुळेच त्यांचे व्हिडिओ टाकणाऱ्यांनी स्वतःहूनच व्हिडिओ डिलीट करायला सुरु केले आहे.

You might also like