चीनमध्ये आढळलेल्या नव्या ‘व्हायरस’चं थेट उंदीरासोबत ‘कनेक्शन’, जाणून घ्या ‘लक्षण’ आणि ‘बचाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनपासून सुरू झालेल्या कोरोना विषाणूने आज संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. यामुळे कोट्यावधी लोक अडचणीत सापडले असून हजारो लोकांनी आपला जीव गमावला. भारतासह जगातील सर्व देशांनी पूर्णपणे लॉकडाऊन केले आहे. येथे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबला नव्हता, तर चीनमध्ये आणखी एका नवीन विषाणूची पुष्टी झाली आहे. सोशल मीडियावरही या विषाणूविषयी जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे. माहितीनुसार, चीनमधील एका व्यक्तीमध्ये हंता व्हायरसच्या नावाचा नवा व्हायरसचा सापडला आहे. जाणून घेऊया हंता व्हायरस संदर्भात,

हंता विषाणू म्हणजे काय ?
रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) नुसार हा विषाणू मुख्यत्वे उंदीरांद्वारे पसरतो आणि लोकांमध्ये अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात. हंता विषाणूमुळे पल्मनरी सिंड्रोम (एचपीएस) आणि हेमोरीजीक तापासोबत किडनीवरही परिणाम करते.

कसा पसरतो हा विषाणू ?
हंता विषाणू ना ही हवेमार्फत पसरतो ना ही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतो. जेव्हा माणूस उंदीर आणि गिलहरींच्या मल, मूत्र आणि लाळच्या संपर्कात येतो तेव्हा या रोगाचा प्रसार होतो. यामुळे हंता विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

हंता विषाणूची लक्षणे
हंता विषाणूच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये थकवा, ताप, स्नायू दुखणे यांचा समावेश आहे. याशिवाय डोकेदुखी, चक्कर येणे, थंडी वाजून येणे आणि पोटाची समस्या देखील दिसून येते. यावर वेळेवर उपचार न केल्यास ते आणखी धोकादायक बनू शकते. सीडीसीच्या मते, त्याचा मृत्यू दर 38 टक्के आहे, जो प्राणघातक असल्याचे सिद्ध होऊ शकते. हंता विषाणूमध्ये किडनीवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे कमी रक्तदाब आणि किडनी निकामी होण्याची शक्यता वाढते. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, उंदरांची लोकसंख्या नियंत्रित केल्यास या विषाणूचा संसर्ग रोखणे सोपे होईल.