उदयनराजेंनी म्हटलं ‘Sorry’ चुकलो, मात्र शशिकांत शिंदेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीनंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी खासदार उदयनराजे भोसले आणि माजी आमदार शशिकांत शिंदे समोरासमोर आल्यावर निवडणुकीतील वैर विसरून एकमेकांच्या गळ्यात पडले होते. यावेळी दोघानांही अश्रू अनावर झाले होते. अशा बातम्या आल्या होत्या. ही गळाभेट जिल्ह्याच्या पुढच्या राजकारणात नवीन समेट घडविणार का? अशा प्रकारची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगू लागली . मात्र यावर आता शशिकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं असून ही भेट म्हणजे चुकून झालेली भेट होती. अश्रू अनावर झाल्याच्या बातम्या निराधार आहेत. उदयनराजे भोसले आणि माझा मार्ग वेगळा आहे. कार्यकर्ते आणि लोकांनी गैरसमज करून घेऊ नये, असं शिदें यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे.

निवडणुकीनंतर उदयनराजे आणि माझा संपर्कही आला नाही. एका कार्यकर्त्याच्या लग्नासाठी गेलो असताना त्यावेळी उदयनराजेदेखील त्या ठिकाणी आले होते. त्यावेळी मी तिकडे उभा होतो. आल्यावर त्यांनी मला मिठी मारली आणि सॉरी मी चुकलो असं दोनवेळा म्हणाले. त्यावर मी प्रतिसाद दिला नाही. तसंच मी त्यांना म्हणालो की तुम्ही स्वत:बरोबरच माझंही नुकसान करून घेतलं.

उदयनराजे आणि माझा मार्ग वेगळा आहे. कार्यकर्ते आणि लोकांचा गैरसमज होऊ नये यासाठी हे सत्य मी समोर आणलं आहे. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेसोबत ठाम आहे. शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात आणि राज्यात काम करत आहे अशी स्पष्ट भूमिका शशिकांत शिंदे यांनी मांडली.

उदयनराजे भोसले आणिशशिकांत शिंदे हे एकमेकांचे जीवलग मित्र होते. मात्र उदनयराजे भोसले यांनी पक्ष बदलल्यानंतर व निवडुकीत दोघांचाही पराभव झाल्यामुले त्यांच्यामध्ये वितुष्ट आले.