दारुचा परवाना मागितल्याच्या कारणावरुन पोलिसाला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

मागील काही दिवसांपासून पुणे शहरात पोलिसांना धक्काबुक्की करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांवर आरेरावी करून शसकीय कामात अडथळा निर्माण केला जातो. असाच एक प्रकार डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि.४) रात्री सव्वा आठच्या सुमरास नदीपात्राच्या रोडलगत घडला आहे. गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला गाडीत दारु पित बसलेल्या तिघांनी धक्काबुक्की केली. पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d03f3830-c979-11e8-9f69-9fcdb8d8bafb’]

निलेश भास्कर ताजमे (वय-२९ रा. शिवाचीवाडी, मोशी), पुष्कर प्रभाकर मंडलीक (वय-२९ रा. शनिवार पेठ), पियुष दिलीप दुगड (वय-३२ रा. आडत बाजार शिरुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार तुकाराम विठ्ठल रायकर (वय-३८ रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

‘त्या’ ११ गावांमधून दोन नगरसेवक निवडणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार तुकाराम रायकर हे डेक्कन पोलीस ठाण्यात कार्य़रत आहेत. गुरुवारी रात्री ते आपल्या इतर साथीदारांसह पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घलत होते. नदीपात्राच्या रोडच्या कडेला एका पाढऱ्या रंगाच्या गाडीत आरोपी दारू पित बसले होते. त्यामुळे रायकर यांनी आरोपींना दारु पिण्याचा परवाना आहे का अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी गाडीतून बाहेर येऊन रायकर यांच्याशी हुज्जत घालून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच त्यांचा गणवेश फाडला. आरोपीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्हि.के. महांगडे करीत आहेत.

[amazon_link asins=’B00TE7QY7S’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e2c6df70-c979-11e8-8aa6-7787166fa175′]