अजित पवार यांच्या पाठोपाठ आणखी NCP च्या खासदाराला ‘कोरोना’ची लागण !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या आणखी एका खासदाराला कोरोनाची लागण झाली आहे. खा. सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना कोरोना झाल्यानंतर आता मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सोमवारी तटकरे यांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली होती. आज त्यांचा कोरोना (Covid-19) टेस्ट रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. सुनील तटकरे यांची प्रकृती उत्तम असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद यांच्या बळावर लवकरात लवकर पुन्हा सेवेत रुजू होईन असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

कणकण आणि थकवा असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) होम क्वारंटाईन झाले होते. परंतु आता अजित पवारांना उपचारांसाठी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. परंतु त्यांची प्रकृती उत्तम आहे असं खुद्द अजित पवार यांनी ट्विट करून सांगितलं होतं.

You might also like