‘डॉन’ आणि ‘अग्निपथ’नंतर अमिताभ बच्चन यांच्या ‘या’ सिनेमाचा येणार हिंदी ‘रिमेक’

पोलीसनामा ऑनलाईन टीम –    बॉलिवूडचे महानायक आणि शहनशाह अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यांचे काही सिनेमे आजदेखील तितक्याच आवडीने पाहिले जातात. त्याचबरोबर त्यांच्या अनेक सुपरहिट सिनेमांचे रिमेक ( Remake) वेगवेगळ्या भाषांमध्ये तयार झाले. त्यांच्या ‘डॉन’ आणि ‘अग्निपथ’च्या हिंदी रिमेकलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यांच्या ‘सत्ते पे सत्ता’ ( Satte Pe Satta ) सिनेमाच्या रिमेकचीही चर्चा रंगली होती. पण आता त्यांच्या नवीन सिनेमाच्या रिमेकची चर्चा सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट ‘नमल हलाल’ (Namak Halal) सिनेमाचा हिंदी रिमेक केला जाणार आहे. १९८२ मध्ये रिलीज झालेल्या या धमाकेदार सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्मिता पाटील,( Smita Patil) परवीन बाबी, ( Parvin Babi)शशी कपूर ( Shashi Kapoor) आणि ओमप्रकाश (Ompraksh) यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. त्याचबरोबर या सिनेमातील सर्व गाणी देखील सुपरहिट ठरली होती. त्यानंतर आता ‘नमक हलाल’चे राइट्स ‘कबीर सिंग'( Kabir Singh) सारख्या सुपरहिट सिनेमाचे निर्माते मुराद खेतानी ( Murad Khetani) यांनी खरेदी केले आहेत. खेतानी यांनी यासंदर्भातील माहिती एका न्यूज पोर्टलला दिली आहे.

दरम्यान, या सिनेमाविषयी बोलताना ते म्हणाले की,हा सिनेमा प्रत्येक वयाच्या प्रेक्षकांना आवडला होता. सध्या आम्ही या सिनेमाच्या स्क्रीप्टवर काम करत आहोत. तसेच मुराद यांनी सांगितले की, अजूनपर्यंत या सिनेमाचं दिग्दर्शन कोण करणार आणि कलाकार कोण असतील हे फायनल झालेलं नाही. त्यामुळे या चित्रपटात अमिताभ बच्चन, शम्मी कपूर आणि परवीन बाबी यांच्या या भुमीका कोण साकारणार याकडे सर्व रसिकांचे लक्ष लागून आहे.

You might also like