खुशखबर ! ‘वाहन’ खरेदीवर मिळणार बंपर ‘डिस्काऊंट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात सर्वात जास्त कार खरेदी नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्या दरम्यान होते. या दरम्यान कार कंपन्याकडून खरेदीदारांना जबरदस्त डिस्काऊंट देण्यात येते. परंंतू यंदा असे होणार नाही. यावर्षी ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या फेस्टीवलच्या दरम्यान एवढे डिस्काऊंट देण्यात येणार नाही जेवढे सण सणावळ झाल्यानंतर देण्यात येणार आहे.

३१ मार्च २०१८ आधी विकावा लागेल कारचा स्टॉक –

फरीदाबादच्या स्मॉल इंडस्ट्रीज एसोसिएशनच्या प्रेसिडेंट राजीव चावला यांनी सांगितले की दिल्ली एनसीआर मध्ये आतापर्यंत जवळपास ३५ हजार कोटी रुपयांचा कारचा स्टॉक पडून आहे. तर पुढील वर्षांपासून फक्त बीएस-६ इमिशन नाॅर्म्स असलेल्या कारची विक्री होणार आहे. त्यामुळे कंपन्याना ३१ मार्च २०२० च्या आधी कारची विक्री करणे आवश्यक आहे. अंदाज बांधला जात आहे की या फेस्टिवल सीजन दरम्यान कारची विक्री झाली नाही तर त्यानंतर कंपन्याना स्वस्त किंमतीत वाहने विकावी लागतील.

घटणार कारचे उत्पादन –

राजीव चावला याच्या मते मारुती सुझुकी, होंडा, हीरो सारख्या कंपन्यांकडून जुलै महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यासाठी पार्टची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे कंपन्या आधिक उत्पादन घेऊ इच्छित नाही. कारचे उत्पादन न झाल्यास लोखंड आणि स्टीलची मागणी देखील कमी होईल.

परंतू सणासुदीनंतर कंपन्या वाहनाने स्वस्त दरात विकण्याची शक्यता आहे, त्यामुळे कार घेण्याची इच्छा असल्यास सणासुदीनंतर खरेदी केल्यास मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट मिळण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like