‘दूरसंचार’ क्षेत्रात ‘दबदबा’ निर्माण केल्यानंतर आता रिलायन्स ‘या’ व्यवसायात उतरण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दूरसंचार क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आता डायग्नोस्टिक्सच्या (diagnostics) व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनीने यासाठी मोठी तयारी केली आहे. यासाठी RIL आपली सहाय्यक कंपनी Reliance Life Sciences (RLS) च्या माध्यमातून पॅथोलॉजी लॅब सुरु करण्याचा तयारीत आहे.

यासाठी स्थानिक Entrepreneur नवउद्योजकांशी संपर्क करण्यात आला आहे. एका व्यक्तीने सांगितले की या संबंधित रिलायन्सकडून प्रस्ताव आला आहे. ज्यात 15:85 या प्रकारे मिळणारे उत्पन्न वाटून घेण्याचा प्रस्ताव आहे. यातील 15 टक्के रिलायन्सकडे असणार आहेत.

एका वृत्तनुसार रिलायन्सकडून पॅथोलॉजी लॅबचे नेटवर्क बनवण्याची तयारी सुरु केली आहे. सुरुवातीला कंपनीकडून 20 – 30 लॅब तयार करण्याची योजना आहे. त्या व्यक्तीने सांगितले की भागीदारी शेअर नेट सेल्सवर आधारित असेल आणि लॅब बनवण्यासाठी लागणारा खर्च सुविधानुसार असेल.

यानंतर RIL च्या प्रवक्तांने सांगितले की तुमच्याकडे जी माहिती आहे की काल्पनिक आहे. रिलायन्सने टेलीकॉम क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतर जिओमुळे टेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा वाढली. जिओने टेलीकॉम क्षेत्रातील कंपन्यांना मोठे आव्हान दिले होते. त्यामुळे येत्या काळात तुम्हाला डायग्नोस्टिक्ससाठी एक पर्याय म्हणून रिलायन्स उपलब्ध असू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Visit : Policenama.com