आमचे खासदार निवडून आणल्यावरच काँग्रेसशी बोलणी करू

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर नाचणारे हे मोदी सरकार उखडून फेका असे आव्हान करतच आता काँग्रेस सोबत आमचे खासदार निवडून आणल्यावरच बोलू असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. ते आज गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या सभेत मालेगाव या ठिकाणी बोलत होते.

कॉलेज ग्राउंडवर भरलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला चांगलेच फटकारले आहे. धुळे-मालेगाव मतदारसंघासाठी कमाल हाशीम यांची उमेदवारी देखील प्रकाश आंबेडकर यांनी याच सभेत जाहीर केली आहे. त्यानंतर त्यांनी आणि कमाल हाशीम यांनी मंचावर हात उंचावून उपस्थित जनसमूहाला अभिवादन केले आहे.

भाजपचा विरोध फक्त प्रादेशिक पक्षच करत आहेत. तर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी भाजपचे मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करत आहेत असे म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सहित काँग्रेसवर हि निशाणा साधला आहे. भारताच्या आर्थिक परिस्थीवर हि आंबेडकर यांनी या सभेत भाष्य केले आहे तसेच त्यांनी एमआयएम सोबत केलेल्या आघाडीचे देखील समर्थन केले आहे. काँग्रेस सोबत आता कोणतीच आघाडी केली जाणार नाही. त्यांच्या सोबत आघाडी हि केवळ खासदार निवडून आल्यावरच केली जाईल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.