Analysis : झारखंडचा झटका, सत्ता आणि संघटनाचा ‘आढावा’ घेण्यात ‘मग्न’ झाले PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे पहिले सहा महिने चांगलेच व्यस्त राहिले. पंतप्रधानांनी एका नंतर एक असे मोठे आणि काही महत्वाचे निर्णय घेतले. तर दुसरीकडे विधासभेमध्ये सरकारला अपयशाचा सामना देखील करावा लागला. हरियाणामध्ये सरकार बनले परंतु महाराष्ट्रात विरोधकांनी एकजूट दाखवत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आणि झारखंडने तर जोरदार झटका देत केंद्रीय नेतृत्वाला विचार करायला भाग पाडले.

त्यानंतर संपूर्ण देशभरात सीएए विरोधात झालेल्या आंदोलनांमुळे भाजप नेतृत्वाला हालवून टाकले. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा सर्व सूत्र आपल्याकडे घेतली यामुळे पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये जोश दिसू लागला आहे. पंतप्रधानांनी यावर काम करण्यासाठी डिसेंबर महिन्यातच सुरुवात केली होती यासंदर्भात त्यांनी दिल्लीला एक महत्वाची बैठक देखील बोलावली होती. या बैठकीमागचा सर्वात महत्वाचा उद्देश केवळ आणि केवळ 2024 चे लक्ष निश्चित करणे एवढाच होता. यावेळी पंतप्रधानांनी थोड्या दिवसांच्या रिपोर्टवरून लक्ष हटवून निर्धारित वेळेमध्ये काम करावे लागेल असे सर्व मंत्र्यांना सांगितले.

पंतप्रधानांकडून मंत्र्यांना निर्देश, होमवर्क देखील दिला
पंतप्रधानांनी काउंसिल ऑफ मिनिस्टर्सची दोन दिवसांची बैठक पुन्हा एकदा बोलवली. यामध्ये अनेक मंत्री प्रेजेंटेशन करणार आहेत. एवढेच नाही तर मकर संक्रांतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. म्हणजेच पुढील साडेचार वर्षांसाठी मंत्र्यांना त्यांचा होमवर्क देण्यात येणार आहे.

कार्यकर्त्यांना घरोघरी पाठवण्याची देखील तयारी सुरु
कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी सीएए बाबत एक कॅम्पेन सुरु केले जाणार आहे. ज्यामध्ये कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन याबाबत लोकांना माहिती द्यायची आहे. विशेष म्हणजे देशाच्या सर्व राज्यांमध्ये हे कॅम्पेन सुरु केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये संघाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभाग घेणार आहेत.

विधानसभेतील पराभवाचे आकलन सुरु
झारखंडमध्ये मिळालेल्या धक्क्यामुळे आता नेतृत्वाने पराभवाचे कारण शोधायला सुरुवात केली आहे तसेच पुढील दोन वर्षांमध्ये येणाऱ्या निवडणूक कशा प्रकारे जिंकता येतील याचा देखील विचार केला जात आहे.

या राज्यांमध्ये संघटनेवर देणार लक्ष
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आसाम अशा राज्यमध्ये संघटन वाढवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जातोय तसेच 200 आमदार असलेल्या युपीवर देखील भाजप विशेष लक्ष देऊन आहे. कारण आता राज्यातील नेतृत्वाबाबत असलेल्या वादांवर भाजपला वेळ घालवायचा नाही त्यामुळे नेतृत्व थेट कामावर लक्ष केंद्रित करत आहे.

फेब्रुवारी पर्यंत अनेक राज्यांमध्ये नव्या अध्यक्षांच्या घोषणा
फेब्रुवारी पर्यंत भाजपच्या नव्या अध्यक्षांची घोषणा केली जाणार आहे. अनेक राज्यामध्ये याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे. नव्या अध्यक्षांच्या घोषणेनंतर नव्या टीमची घोषणा देखील केली जाईल. तसेच आगामी काळात पंतप्रधान मोदी आपल्या कॅबिनेटमध्ये देखील बदल करू शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/