5 राज्यातील निवडणुकीनंतर सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर आता पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. शासनाच्या दबावामुळे गेल्या दोन महिन्यात तेल कंपन्यांनी भाव वाढ रोखून धरली होती. ती आता पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पाच राज्यातील निकाल लागल्यानंतर आज (दि. 5 मे) सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पुण्यात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १८ पैशांनी महागले आहे. आज (दि. 5 मे) पेट्रोलचा दर ९६.८० रुपये लिटर झाला आहे.

डिझेलच्या दरात २२ पैशांची वाढ झाली आहे. डिझेलची किंमत ८६.३२ वरुन ८६.५४ रुपये लिटर झाली आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात १८ पैशांची वाढ होऊन ते आता १००. ४८ रुपये लिटर झाले आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर २७ फेब्रुवारीपासून ६६ दिवस पेट्रोल -डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती. निवडणुकीच्या काळात पेट्रोल -डिझेलच्या दरात उलट घट केली होती. गेल्या महिन्याभरात कच्च्या तेलाचे दर ८ डॉलरने वाढले होते. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने तेल आयात महागली होती. मात्र, निवडणुकीमुळे तेल कंपन्यांना दरवाढ करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे या पुढील काही दिवस पेट्रोल -डिझेलच्या दरात आणखी दरवाढ सोसण्याची तयारी ग्राहकांना ठेवावी लागणार आहे.

यापूर्वीचे दर

शहरातील इंधनाचे दर

४ मे २०२१

पेट्रोल : ९६.६२ पॉवर पेट्रोल : १००.३० डिझेल : ८६.३२ सीएनजी : ५५.५०

१५ एप्रिल २०२१

पेट्रोल : ९६.४५  पॉवर पेट्रोल : १००.१३ डिझेल : ८६.११ सीएनजी : ५५.५०

२४ मार्च २०२१

पेट्रोल : ९७.२  पॉवर पेट्रोल : १००.७०  डिझेल : ८६.७० सीएनजी : ५५.५०

२५मार्च २०२१

पेट्रोल : ९६.८१  पॉवर पेट्रोल : १००.५०   डिझेल : ८६.७९  सीएनजी : ५५.५०

३०मार्च २०२१

पेट्रोल : ९६.६०   पॉवर पेट्रोल : १००.२९   डिझेल : ८६.२६   सीएनजी : ५५.५०

२३फेब्रुवारी २०२१

पेट्रोल : ९६.९६  पॉवर पेट्रोल : १००.६४  डिझेल : ८६.७२  सीएनजी : ५५.५०

२७ फेब्रुवारी २०२१

पेट्रोल : ९७.१९  पॉवर पेट्रोल : १००.८७  डिझेल : ८६.८६   सीएनजी : ५५.५०