Facebook नंतर आता LinkedIn च्या 500 मिलियन युजर्सचा डाटा ‘लिक’, पत्ता अन् फोननंबरचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्याचा युजर्सही मोठा आहे. त्यानुसार डाटा चोरीचा धोकाही यामध्ये आहे. त्यातच Facebook च्या 533 मिलियन युजर्सचा डाटा लिक झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्याला एक आठवडाही झाला नाही तोच आता आणखी एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा डाटा लिक झाला आहे.

मायक्रोसॉफ्ट अधिकृत प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म LinkedIn च्या तब्बल 500 मिलियन युजर्सचा डाटा लिक झाला आहे. हा डाटा आता ऑनलाईन विकलाही आहे. याबाबत एका हॅकर ग्रुपने युजर्सचा डाटा त्यांच्या प्रोफाईलमधून चोरला आहे. ऑनलाईन चोरी केलेल्या डाटामध्ये युजर्सचे पूर्ण नाव, ई-मेल ऍड्रेस, फोन नंबर, वर्कप्लेस इन्फॉर्मेशन आणि इतर माहितीचा समावेश आहे. या रिपोर्टचा खुलासा सायबर न्यूजने केला आहे.

दरम्यान, या रिपोर्टमध्ये युजर्सचा हा डाटा हॅकर्स ग्रुप 2 मिलियनच्या किमतीमध्ये विकत आहे. येत्या काही दिवसात त्याची रक्कम आणखी वाढू शकते. म्हणजेच हा ग्रुप युजर्सच्या माहितीला बिटकॉईनच्या माध्यमातून विकू शकतो.

डाटा ब्रीच नाही

याबाबत कंपनीने सांगितले, की आम्ही जो रिव्ह्यू केला त्यामध्ये हेच समजले, की यामध्ये पब्लिकली व्युऐबल मेंबरचा प्रोफाईल डाटा जरूर आहे. यामध्ये LinkedIn च्या माध्यमातून घेतले गेले. मात्र, हा डाटा ब्रीच नाही. प्रायव्हेट मेंबरचा अकाउंट डाटा आमच्या प्लॅटफॉर्मवरून घेतला गेला नाही.