‘इथं’ लग्नानंतर नवरा-नवरीला 3 दिवस ‘टॉयलेट’ला जाऊ दिलं जात नाही ! कारण वाचल्यानंतर डोकं ‘चक्रावेल’

पोलिसनामा ऑनलाइन –असे अनेक लग्न असतात जिथं वेगळ्या प्रथा, रिती रिवाज असतात. अशीच एक विचित्र प्रथा आहे जी ऐकून तुमचं डोकं चक्रावून जाईल. असा रिवाज हे की, लग्नानंतर वधु आणि वराला तीन दिवस टॉयलेटला जाऊ दिलं जात नाही.

ही प्रथा किंवा रिवाज इंडोनेशियातील टीडाँग सामुदायातील लोकांची आहे. या सामुदायातील लोक आपल्या रिती रिवाज प्रथांना खूप महत्त्व देतात. या सामुदायातील लोकांचं म्हणणं आहे की, लग्न एक पवित्र समारंभ आहे. अशात नवरा-नवरी लग्नानंतर टॉयलेटला गेले तर ही पवित्रता भंग होते. जर याचं कोणी पालन केलं नाही तर तो अपशकुन मानला जातो. हेच कारण आहे की, नवरा नवरीला तीन दिवस टॉयलेटला जाऊ दिलं जात नाही. या सामुदायातील लोक याचं इमानदारीनं पालन करतात.

टीडाँग सामुयादायातील लोकांचं असंही म्हणणं आहे की, टॉयलेट ही एक अशी जागा आहे ज्याचा वापर अनेक लोक करतात. इथं लोक शरीरातील घाण काढतात. त्यामुळं इथं नकारात्मक शक्ती असते. जर नवरा किंवा नवरीनं टॉयलेटचा वापर केला तर ही नकारात्मक शक्ती त्यांच्यात सामावते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येतात. त्यामुळं नवरा-नवरीनं लग्नानंतर तीन दिवस टॉयलेटचा वापर करू नये यासाठी त्यांना जेवणही कमी दिलं जातं जेणे करून ते टॉयलेटला जाणार नाही आणि अपशकुन होणार नाही.