जगाला Coronavirus दिल्यानंतर ‘ड्रॅगन’ बोलला, म्हणाला – ‘प्रगती करायचं थांबणार नाही चीन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे चीन संपूर्ण जगाच्या नजरेत आहे, परंतु चीन ने म्हटले आहे की त्यांच्याकडे कुणीही कितीही बोट दाखवले तरीही चीनची प्रगतीच्या दिशेने होणारी वाटचाल थांबू शकत नाही. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी आज म्हटले आहे की जे इतरांकडे बोट दाखवतात, शेवटी त्यांची स्वतःची प्रतिष्ठा खाली येते. चीनने असे ही म्हटले आहे की आता जग हे पूर्वीसारखे राहणार नाही, म्हणून ते पुढे जाणे थांबवणार नाहीत. विशेष म्हणजे कोरोना विषाणूबद्दल चीन संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि नुकताच ज्या प्रकारे चीनने उन्माद माजवला आहे, त्यावरून असे दिसून येते की चीनला बरेच काही लपवायचे आहे आणि जेव्हा संपूर्ण जग हतबल होईल तेव्हा ते स्वत:ला सुपर पॉवर म्हणून स्थापित करू इच्छित आहेत.

चीनचे म्हणणे आहे की कोविड -19 ने चीनच्या सामाजिक प्रणाली आणि सरकारच्या क्षमतेची चहूबाजूंनी परीक्षा घेतली आहे. चीनचे म्हणणे आहे की ते चाचणीत यशस्वी ठरले आहेत आणि एक जबाबदार विशाल देशाच्या रूपात आपली राष्ट्रीय शक्ती दर्शविली आहे.

वांग यी यांनी म्हटले आहे की, ‘कोविड -19 नंतर आमची अर्थव्यवस्था आणखी मजबूत आणि लवचिक होईल आणि आमचे लोक एकजूट व विश्वासाने राहतील. कोविड -19 ने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की कोणताही देश कितीही शक्तिशाली असला तरी तो स्वत:ला जागतिक आव्हानापासून वेगळे करू शकत नाही. आपत्तीच्या कहरास सुरक्षित अंतरावरून निष्क्रियपणे पाहत बसल्याने हल्लाच होईल.’ इतकेच नाही तर ते म्हणाले की, ‘इतरांवर बोट दाखवल्याने स्वतःचीच प्रतिष्ठा खराब होते. एखाद्या देशाला या समस्येचे निदान करण्यात मदत करण्याऐवजी केवळ अहंकार व दोष देत बसल्यास त्यात कायदेशीर हक्कांचे आणि हितसंबंधांचेच नुकसान होते.’