Coronavirus : ‘नो कोरोना, नो कोरोना’ ! रामदास आठवले यांची नवी घोषणा

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना गो, गो कोरोना ही घोषणा देशाला देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता नवीन घोषणा दिली आहे. गो कोरोना, कोरोना गो नाही तर नो कोरोना, नो कोरोना अशी घोषणा आठवले यांनी दिली.

मला हवा होता तसा कोरोना जाताना दिसत नाही. मात्र, इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात तेवढे प्रमाण नाहीय, अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली. गेट वे ऑफ इंडिया येथे चीन देशाच्या काही प्रतिनिधींसोबत प्रतिकात्मक ’कोरोना गो’ची घोषणा दिल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आपण घरात राहणे आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात प्रथमचं मी स्वतःला घरात कोंडून घेतल्याचे त्यांनी सांगितले. मी कविता करतो, मित्रांना फोन करतो, गिटार वाजवतो, स्नूकर खेळण्याचा प्रयत्न करत वेळ घालवत असल्याचे त्यांनी सांगितले.

चीनमध्ये कोरोना आला होता, त्यामुळे कोरोना गो ही घोषणा मला आठवली. माझे नाव आठवले असल्याने मला योग्य गोष्टी योग्य वेळी आठवतात, असं मिश्किल उत्तरही त्यांनी दिले आहे. या घोषणेमुळे माझे नाव आंतराष्ट्रीय पातळीवर पोहचले असल्याचे त्यांनी नमूद केले. आता मी म्हणतो गो कोरोना, गो कोरोना…नो कोरोना नो कोरोना असे म्हणत आहे. माझ्या घोषणेने कोरोना जाणार नाही. मात्र, ही घोषणा प्रतिकात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनामुळे घरी राहावे लागत असल्याने मला आता खूप वेळ मिळत आहे. हा वेळ मी माझी पत्नी, मुलगा, बहीण यांच्यासोबत घालवत आहे. पूर्वी कामाचा व्याप जास्त असल्याने मला वेळेवर नाश्ता, जेवण करता येत नव्हते. मात्र, आता वेळेवर जेवण होते. स्वयंपाक घरात तुम्ही का दिसले नाही? या प्रश्नावर आठवले म्हणाले, की मला स्वयंपाकातले जास्त कळत नाही. मात्र, मी आता नक्की प्रयत्न करेल. त्यामुळे भविष्यात आठवले यांचे स्वयंपाक घरातील फोटो पाहायला मिळण्याची शक्यता आहे.