राम मंदिरासंदर्भात केलेल्या पोस्टवरून क्रिकेटपटूच्या पत्नीला दिली बलात्काराची धमकी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राम मंदिर भूमिपूजनासंदर्भात सोशल मीडियावर केली. या पोस्टमुळे काही कट्टरवाद्यांनी भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीना जहाँ हिला बलात्काराची धमकी दिलीय. यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. हसीना जहाँ हि सोशल मीडियावर अनेक बाबीमुळे चर्चेत असते. त्यामुळे तिला युझर ट्रोल करतात. अयोध्येमध्ये पाच ऑगस्ट रोजी राम मंदिराचे भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या संदर्भात सोशल मीडियावर अनेकप्रकाराचे मत मतांतरे व्यक्त केली जात होते.

यावेळी हसीना यांनी हि राम मंदिर संदर्भात पोस्ट केली. मात्र, काही हिंदुत्वच्या लोकांनी ती महिला असल्याने तिला बलात्काराची धमकी दिलीय. यामुळे त्यांनी पंतप्रधान यांच्याकडे मदत मागितली आहे. यावेळी हसीना हिने सोशल मीडियावरून येणार्‍या धमक्यांना त्रासून अखेर इस्टाग्रामवर आणखी एक पोस्ट शेअर केली. या पोस्टव्दारे तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मदत मागितलीय. हसीना आणि क्रिकेटपटू मोहम्मद शमी यांच्यात काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. यावरून तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलंय.

अशी होती ती पोस्ट…
समस्त हिंदू समाजाचे श्री राम मंदिरचे भूमी पूजन झाल्याबद्दल अभिनंदन. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्व देशवासियांनी एकत्र येऊन भाईचारा दाखवावा आणि भारताला जगापुढे विश्व शक्ती बनवावे. याअगोदर हसीनने मोहम्मद शमीवर गंभीर आरोप केलेेत. त्याचबरोबर शमीच्या भावाने माझ्यावर बलात्कार केला आहे, असेही सांगितले होते. त्यामळे चाहते हसीनवर नाराज झाले असून काही जणांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच त्यांनी तिला बलात्काराचीही धमकी दिलीय.

राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफचे एक ट्विट व्हायरल होत आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर कैफने एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये कैफ म्हणाला, अलाहाबाद या शहरात मी लहानाचा मोठा झालोय. त्यामुळे या शहराची संस्कृती मला चांगलीच माहिती आहे. ही संस्कृती गंगा-यमुना यांची आहे. मला रामलीला पाहणे आवडत असून मी त्याचा चाहता आहे. राम हे प्रत्येक माणसामधील चांगले गुण पाहायचे. त्यामुळे त्यांचे हे विचार आपण पुढे न्यायला हवे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, जी लोकं द्वेष किंवा तेढ निर्माण करतात. त्यांना प्रेम व एकताच्या मार्गावर येण्याची परवानगी देऊ नये.