हृदयविकाराच्या झटक्यानंतर अ‍ॅड. असीम सरोदे यांच्यावर शस्त्रक्रिया : प्रकृतीत सुधारणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मानवी हक्‍कांसाठी कायम संघर्ष करणारे तरूण अभ्यासू विधिज्ञ असीम सरोदे (४५) यांना सोमवारी तीव्र ह्दयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

अलिकडील काळामध्ये अ‍ॅड. असीम सरोदे यांचे नाव लोकसभा निवडणुकीसाठी चर्चेत आले होते. पुण्यातून आप पक्षत्ततर्फे त्यांनी निवडणुक लढवावी अशी मागणी होत होती. मात्र, आपण निवडणुक लढविण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी जाहिर केलेले आहे. असीम सरोदे हे एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्सला गेलेले आहेत. तेथील थंड वातावरणामुळे त्यांना ह्दयाचा त्रास सुरू झाला आणि सोमवारी त्यांना तीव्र ह्दयविकाराचा झटका आला. दि. २२ रोजी ते तेथून परतणार होते. मात्र, त्यापुर्वी ते मित्रांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. मित्रांनी त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणत आली असुन सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती देण्यात आली आहे.