पंतप्रधान मोदींचा मालदीवमधून दहशवादाला खतपाणी घालणाऱ्यांना इशारा, म्हणाले आता ‘बस्स’ झाले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुन्हा एकदा पंतप्रधान बनल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पहिला दौरा मालदीवचा केला, यावेऴी त्यांनी मालदीवच्या संसदेला संबोधित केले. यावेळी मालदीवशी भारताशी असलेल्या उत्तम संबंधावर भाष्य केल्यानंतर त्यांनी दहशतवादावर देखील आपले मत व्यक्त केले. दहशतवादावर बोलताना ते म्हणाले की, दहशतवाद जगासाठी एक मोठे आव्हान आहे. दहशतवादाचा धोका हा एक देशापुरती आणि क्षेत्रापुरती नाही तर संपूर्ण मानवतेसाठी आहे.

दररोज दहशतवादाशी संबंधित एक ना एक घटना जगात कुठे तरी घडतच असते. रोज कोण ना कोण निश्पाप व्यक्ती आपला जीव गमावतो. त्यामुळे दहशतवादाला कुठून मदत मिळते, त्यांना कुठून आर्थिक सहाय्य मिळते हे शोधणे आवश्यक आहे. ही वाईट बाब आहे की लोक आज देखील गुड टेररिस्ट आणि बॅड टेररिस्ट यात फरक करत आहेत असे म्हणत मोदीं टेररिजम या कल्पनेवर आपले मत मांडले.

ते असे देखील म्हणाले की, दहशतवाद्यांची ना की कोणतीही बँक असते की जी त्यांना दहशतवाद पसरवण्यासाठी पैसा पुरवू शकेल, आणि ना की कोणतीही हत्यारे बनवणारी फॉक्ट्री. मग त्यांना पैशाची आणि हत्यारांची कधी कमी का नसते असा सवाल करत मोदींनी दहशतवादाला पोसणाऱ्यांना सुनावले. दहशतवादाला मिळणारी स्पाँसरशिप जगासाठी सर्वात मोठा धोका असल्याचे ही त्यांनी सांगितले.
दहशतवाद संपुर्ण मानवतेसाठी आणि जगासाठी घातक असल्याचे मोदींकडून मालदीवमध्ये सांगण्यात आले.