दोन्ही भावांच्या विजयानंतर रितेश देशमुखला वडिलांची आठवण, म्हणाला – ‘पप्पा आम्ही करून दाखवलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी काल पार पडली असून भाजपने शिवसेनेसह सत्ता कायम राखली असून या निवडणुकीत दोन भावांच्या जोडीने विधानसभेत प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन पुत्र धीरज आणि अमित यांनी विधानसभा निवडणुकीत यश मिळवले असून त्यांनी आपल्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे सुरु ठेवला आहे. लातूर शहरमधून अमित यांनी विजय मिळवला असून लातूर ग्रामीणमधून धीरज यांनी विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता अभिनेता रितेश देशमुख याने ट्विटरवरून आपल्या दोन्ही भावांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आपल्या वडिलांची देखील याप्रसंगी त्याने आठवण काढली.

आम्ही करून दाखवलं
या पोस्टमध्ये रितेश याने लिहिले कि, आम्ही करून दाखवल पप्पा, त्याचबरोबर त्याने जनतेचे देखील आभार मानले. अमित देशमुख यांनी लातूर शहरमधून 42 हजार मतांनी विजय मिळवला तर धीरज देशमुख यांनी 1.20 लाख मतांनी विजय मिळवला. या ट्विटमध्ये त्याने दोन फोटो टाकले असून एकामध्ये तो गंभीर भावमुद्रेमध्ये दिसून येत असून एकामध्ये तीनही भाऊ प्रचार करताना दिसून येत आहेत.

जिल्हा परिषद ते विधानमंडळ
धीरज देशमुख याने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात हि जिल्हा परिषद सदस्य म्हणून केली होती. तर आता लातूर ग्रामीणमधून विजय मिळवत महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला आहे. विलासराव देशमुख हे दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असून 1999 ते 2003 आणि 2004 ते 2008 पर्यंत मुख्यमंत्री होते.

Visit : policenama.com  

डोळ्यांचा रुक्षपणा घालवण्यासाठी करा ‘हे’ ४ घरगुती उपाय, घ्या जाणून
कानाच्या ‘या’ ५ समस्यांवर हे आहेत घरगुती उपाय ; जाणून घ्या 
‘हे’ ६ घरगुती उपाय करा आणि तात्काळ उचकी थांबवा
‘वेटलॉस’ बाबतचे ‘हे’ १० गैरसमज नुकसानकारकचं !
नियमितपणे १० दिवस ‘वेलची’ खा आणि ‘वजन’ घटवा