धक्कादायक ! मित्रांसोबत केला गर्लफ्रेंडवर बलात्कार, नंतर आईच्या मदतीनेच जिवंत जाळलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या अत्याचार आणि त्यानंतर होणारे पीडितांचे खून या घटनांनी देश हादरला आहे. हैदराबाद आणि उन्नावची घटना ताजी असतानाच अशीच एक धक्कादायक घटना त्रिपुरामध्ये उघडकीस आली आहे. एका 17 वर्षीय मुलीवर तिच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्राने बलात्कार केला व त्यानंतर प्रियकराने आईच्या मदतीने मुलीला पेटवून दिल. यामध्ये पीडित मुलगी 90 टक्के भाजली. घटनेनंतर पीडितेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना घडण्याच्या दोन दिवस आधी 2 महिने मुलीला कैद करून ठेवण्यात आलं होतं. यावेळी पीडित तरुणीच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्राने वारंवार तिच्या सामूहिक बलात्कार केला. तसेच आईच्या मदतीने आरोपी मुलांनी तरुणीला जिवंत जाळलं.

पीडित मुलगी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाला भेटली. त्यांनतर त्या तरुणाने तिच्या घरच्यांपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. यानंतर ही मुलगी या युवकाकडे राहू लागली. मात्र आरोपीने तिला जबरदस्तीने दोन महिन्यांपासून कैद करून ठेवलं होत आणि मुलीला सोडण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी करण्यास सुरवात केली, असा पीडितेच्या कुटुंबाचा आरोप आहे. मुलगी बेपत्ता होताच तिने तक्रार दाखल केली होती, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. मुलीला सुखरुप सोडवण्यासाठी पैशांची जुळवाजुळव सुरू होती पण फक्त 17 हजार रुपयेच ते मिळवू शकले. त्यामुळे रागत असलेल्या आरोपींनी पीडित तरुणीला जाळून तिची हत्या केली अशी माहिती पीडितेच्या आईने दिली आहे.

Visit : Policenama.com

You might also like