भारतानंतर अमेरिकेतसुद्धा TikTok बॅन !

वॉशिंग्टन : भारतानंतर आता अमेरिकेने सुद्धा चायनीज व्हिडिओ अ‍ॅप टिकटॉक बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका रविवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा करू शकते.

एएफपी न्यूज एजन्सीनुसार, अधिकार्‍यांनी सांगितले की, पूर्ण अमेरिकेमध्ये रविवारपासून टिकटॉक आणि वुईचॅटच्या ऑपरेशन्सवर पूर्णपणे प्रतिबंध लावण्यात येईल.

20 सप्टेंबरपासून डाऊनलोड होणार नाही
माहितीनुसार, अमेरिकन व्यापार विभागाने आज एक आदेश जारी करण्याची योजना बनवली आहे, ज्याअंतर्गत 20 सप्टेंबरच्यानंतर अमेरिकेत राहणारे लोक चायनीज व्हिडिओ-शेयरिंग अ‍ॅप टिकटॉक आणि वुईचॅट डाऊनलोड करू शकणार नाहीत.

यापूर्वी भारताने टिकटॉकसह 106 चायनीज अ‍ॅपवर प्रतिबंध लावला होता. भारताच्या या पावलाचे अमेरिकन प्रशासन आणि खासदारांनी स्वागत केले होते.

अमेरिकेत टिकटॉकसाठी नवा बिझनेस पार्टनर
चायनीज कंपनी बाइटडान्स ही टिक टॉकसाठी अमेरिकेमध्ये बिझनेस करण्यासाठी नवा पार्टनर शोधत होती. अमेरिकन मीडियानुसार बाइटडान्सने अमेरिकेत टिकटॉकच्या संचालनासाठी टेक कंपनी मायक्रोसॉफ्टची ऑफर फेटाळून ओरॅकलला निवडले आहे. मात्र, ऑफिशियल स्तरावर याची घोषणा झालेली नाही. तर ओरॅकलला ही पार्टनरशिप मिळण्याबाबत संशय आहे.

टिकटॉकच्या पार्टनरशिपसाठी मायक्रोसॉफ्ट-वॉलमार्ट, ओरॅकल आणि सेंट्रिक्स असेट मॅनेजमेंट लिमिटेड-ट्रिलर इंक इन या तीन कंपन्यांनी ऑफर दिली होती. ज्यामधून ओरॅकलला संधी दिली जात आहे.