#Surgicalstrike2 : भारतीय वायुदलाच्या कारवाईनंतर ‘हा’ सिनेमा मोठ्या प्रमाणात सर्च

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानविरोधात भारताने आज मोठी कारवाई केली. या कारवाईनंतर भारतीय हवाई दलावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच सर्व भारतभर आनंदोत्सव साजरा केला जात आहे. वायुदलाच्या हल्ल्यानंतर आदित्य धार दिग्दर्शित सिनेमा ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ टोरेंट डाउनलोडवर मोठ्या प्रमाणात सर्च होताना दिसत आहे.

जम्मू काश्मीरच्या ‘उरी’ येथे झालेल्या पाकिस्तानच्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताने यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित हा ‘उरी’ चित्रपट आहे. यात विकी कौशल याने प्रमुख भूमिका केली आहे. विकीसह यात मोहीत रैना, परेश रावल, यामी गौतम आणि किर्ती कुल्हारी यांचीही प्रमुख भूमिका आहे. सात आठवड्यानंतरही सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.

मणिपूरमध्ये दहशतवाद्यांना नेस्तनाबुत करणाऱ्या तुकडीचा मेजर विहान (विकी) प्रमुख असतो. सैनिकाच्या मनातील चीड, देशप्रेम, शौर्य, वेदना हे सगळे भाव विकीने इतक्या समर्पकपणे सिनेमात मांडलं आहे की, ते प्रेक्षकांपर्यंत आपसूक पोहोचतात. हिंदी चित्रपटसृष्टीत यापूर्वीही युद्धावर आधारित चित्रपट काढण्यात आले आहेत. पण लष्कराच्या अशा प्रकारच्या कारवाईवर, वॉर रुम, प्रत्यक्ष निर्णय प्रक्रीया याचं चित्रण कोणत्याच चित्रपटात इतक्या ठळकपणे करण्यात आलेलं नाही.

भारतीय वायूदलाने केलेल्या कारवाईचे जनसामान्यांपासून बॉलिवूड मंडळीचे वक्तव्य समोर येत आहेत. सोशल मीडिच्या माध्यमातून ते आपले मत व्यक्त करत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार अजय देवगण, कमल हसन, परेश रावल आणि आता अभिनेत्री कंगणा राणौतने भारतीय वायुदलाचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले आहे. बॉलीवुडमधील प्रत्येकाने ‘सर्जिकल स्ट्राइक २. ० ‘ म्हणून या ऑपरेशनचे स्वागत केले.

#Surgicalstrike2 : ५० बातम्या एकाच क्लिक वर