IPL 2021 स्थगित झाल्यानंतर भारतीय क्रिकेटला बसणार आणखी एक धक्का; PAK मीडियाने केला ‘हा’ दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोनाच्या महामारीने अनेक व्यवहार आणि देशातील चालत्या गाडीला ब्रेक लागला आहे. या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेच बीसीसीआयने आज मंगळवारी इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्थगित करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. तर कोलकात नाईट रायडर्स (KKR) चेन्नई सुपर किंग्स (कॅस्क) सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय BCCI ने घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक IPL चाहत्यांना एक भला मोठा धक्का बसला आहे. IPL स्थगित केल्याने चाहत्यांमध्ये निराशा दिसून येते. यामध्येच आता बीसीसीआय आणि देशातील क्रिकेट चाहत्यांना दुसरा एक धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात यदां कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. दैनंदिन बाधितांची संख्या प्रचंड वाढताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर जास्तच भार पडला आहे. अशा परिस्थितीत देखील BCCI ने IPL घेण्याचे ठरवले होते. मात्र काही कालावधीमध्येच सामन्यावर थोडं थोडं संकट येऊ लागले. IPL नियोजनावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) देखील लक्ष होते. तसेच IPL च्या योग्य आयोजनानंतर भारतात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या T- 20 World Cup च्या नियोजनाला अधिक वेग येणार होता. मात्र आता भारताला वर्ल्ड कप देखील होणार नाही असं संकट निर्माण झालेलं दिसत आहे.

आयसीसीने अमिराती क्रिकेट बोर्डाशी T- 20 World Cup २०२१ च्या आयोजनासंदर्भात संपर्क साधला आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतात कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी भाकीत केले आहे. यावरून BCCI आणि ICC या भारतात T- 20 World Cup आयोजन करणे अवघड असल्याचे मान्य केले आहे. अशी माहिती एका पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्र डेली डॉन यांनी दिलेल्या वृत्तानुसार समोर आलीय. तसेच T- 20 World Cup यूएईत आयोजन करण्यासाठी ICC ने ECB शी बोलणं सुरू केलं आहे. तर याबाबत थोडं बोलणं पूर्ण झालं असून, लवकरच यासंदर्भातील निर्णय घेतला जाणार असल्याचे वृत्त डेली डॉन ने म्हटले आहे. तर ICC आणि BCCI यांच्यामध्ये अंतिम बोलणं सूर असून आगामी २ आठवड्यात याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचा दावा पाकिस्तानातील डेली डॉन या वृत्ताने केला आहे.