राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यानंतर एकनाथ खडसेंना देखील ‘कोरोना’ची लागण

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांनी याबाबत ट्विटवरून माहिती दिली आहे. खडसे म्हणाले की, माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.

 

 

 

 

 

 

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची सून भाजपा खासदार रक्षा खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता, माझा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तरी गेल्या 8 दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोविड चाचणी करून घ्यावी, माझी प्रकृती स्थिर आहे अशी माहिती खासदार रक्षा खडसेंनी दिली आहे.