मुंबई सागा : ‘गँगस्टर’ जॉननंतर इमरान हाशमीचा ‘कॉपी’ लुकसमोर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये गँगस्टर चित्रपटांना स्टाइलिश पद्धतीने सादर करणारे दिग्दर्शक संजय गुप्ता आपला नवीन चित्रपट ‘मुंबई सागा’ मुळे खूप चर्चेत आहे. त्यांनी जॉन अब्राहमचा लूक या चित्रपटामधून शेअर केला होता. या फोटोत जॉन राखाडी कुर्ता आणि पांढऱ्या पायजामामध्ये दिसला होता. त्याच्या गळ्यात सोन्याची चेन आणि कपाळावर टिका लावलेला दिसला होता. या चित्रपटात जॉन एका गँगस्टरची भूमिका साकारत आहे. संजय गुप्ता यांनी चित्रपटातून इमरान हाश्मीचा लूक शेअर केला आहे. विशेष म्हणजे इमरानने या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारली आहे.

संजय यांनी ट्विटरवर इम्रानचा एक फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, मुंबई सागाच्या टीममधील प्रत्येक व्यक्ती अस्वस्थ होता की इमरान हाश्मी एका पोलिसाची भूमिका कशी साकारेल. पण स्वत: पहा, त्याने कोणत्या स्टाइलने ही भूमिका साकारली आहे. इमरानने यापूर्वी नकारात्मक किंवा ग्रे शेड भूमिका साकारल्या आहेत. त्याने ‘उंगली’ या चित्रपटात एका इंस्पेक्टरची भूमिका साकारली होती, परंतु ती भूमिका देखील इम्रानच्या ऑनस्क्रीन प्रतिमेशी मोठ्या प्रमाणात जुळणारी होती.

विशेष म्हणजे ‘मुंबई सागा’ हा पीरियड गँगस्टर चित्रपट आहे. 1980 आणि 1990 च्या दशकात बनलेल्या या चित्रपटात खऱ्या घटनांवर आधारित अनेक सीन असतील. या मल्टीस्टारर चित्रपटात इमरान हाश्मी, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर आणि काजल अग्रवाल असे कलाकार दिसणार आहेत. संजय गुप्ता त्याच्या मल्टीस्टारर गँगस्टर चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी ‘कांटे’, ‘मुसाफिर’, ‘शूटआउट अट वडाळा’ आणि ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’, ‘जिंदा’ अशा अनेक गँगस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.