शिवसेनेत ‘एन्ट्री’ केल्यानंतर उर्मिला मातोंडकरांनी खरेदी केलं नवीन ऑफिस, जाणून घ्या किंमत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सक्रियरित्या पक्षाच्या कामाला सुरुवात केली आहे. सेना प्रवेशानंतर काही दिवसातच आपल्या कार्यालयासाठी तीने जागा खरेदी केली आहे. त्यांनी खार पश्चिम परिसरात तब्बल 3 कोटी 75 लाख रूपयांना हे ऑफिस खरेदी केले आहे. 28 डिसेंबर रोजी राजेश कुमार या व्यावसायिकाकडून त्यांनी ही जागा खरेदी केली आहे.

अभिनेत्री उर्मिलाने केलेले हे नव कार्यालय 1 हजार चौरस फूटांमध्ये पसरले आहे. त्यांचे हे कार्यालय खार पश्चिम परिसरातील लिकींग रोड परिसरात आहे. मुंबई मिररने यासदंर्भातील वृत्त दिले आहे. त्यांनी लिकींग रोडवरील दुर्गा चेंबर्स या इमारतीत सहाव्या मजल्यावर 3 कोटी 75 लाख रूपयांना हे ऑफिस खरेदी करण्यात आले आहे. इमारतीचा तळमजला हा व्यावसायिक वापरांसाठी असून वरील मजल्यांसाठी दरमहा 5 ते 8 लाख रुपये एवढ भाड आकारल जात आहे. 36 हजार रूपये प्रति चौरफ फूट या दरानं उर्मिला मातोंडकर यांनी कार्यालयाची जागा खरेदी केली आहे. 28 डिसेंबर रोजी राजेश कुमार या व्यावसायिकाकडून त्यांनी ही जागा खरेदी केली असून उर्मिला मातोंडकर यांनी याबाबत मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

पदासाठी शिवसेनेत प्रवेश नाही
विधान परिषदेची आमदारकी मिळाली नाही तरी शिवसेनेचे काम करतच राहणार आहे. कोणत्याही पदासाठी मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. ज्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये लोकांनी मला स्टार बनवले त्याचप्रमाणे राजकारणात लोकांसाठी नेता बनायचे आहे. एसी रूममध्ये बसून ट्वीट करणारा नेता बनायची माझी इच्छा नाही, अशा शब्दात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आगामी काळात लोकांमध्ये राहून राजकारण करणार असल्याचं यापूर्वी म्हटलं होतं.