शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला म्हणाली – ‘कंगनाला महत्व देण्याची आवश्यकता नाही’, हिंदुत्ववादी पार्टीत जाण्यावर सुद्धा दिले उत्तर

मुंबई : राजकारणाचा दुसरा डाव सुरू करणार्‍या उर्मिला मातोंडकरने म्हटले आहे की, ठाकरे सरकारच्या एक वर्षाच्या कामकाजावर प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर लढणार्‍या उर्मिला मातोंडकरने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मीडियाशी बोलताना सांगितले की, मी काँग्रेस सोडलेली 14 महिने झाले आहेत, 14 तास झालेले नाहीत. हे त्याच्यापेक्षा वेगळे आहे जेव्हा लोक एक पक्ष सोडून लगेच दुसर्‍या पक्षात जातात.

उर्मिला म्हणाली, मला वाटते की, महाविकास आघाडी सरकारने राज्यात कौतूकास्पद काम केले आहे. त्यांना कामासाठी केवळ तीन सामान्य महिने मिळाले आहेत. उद्धवजींनी राज्य चांगले चालवले. जेव्हा गरज असते तेव्हा मजबूती दाखवतात.

सेक्युलर काँग्रेस पक्षातून हिंदूत्ववादी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या निर्णयावर ती म्हणाली, मी हिंदू धर्माच्या जवळ आहे, परंतु कधी ढोल बडवण्याची आवश्यकता वाटली नाही. हिंदुत्व म्हणजे दुसर्‍या धर्माचा द्वेष नाही. मी जन्माने आणि कर्माने हिंदू आहे. मी धर्मावर खुप काही बोलू शकते कारण मी याच्यावर अभ्यास केला आहे.

उर्मिला मातोंडकरने अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेतील वादावार बोलण्यास नकार दिला. सोबत हे सुद्धा म्हटले की, ती कंगनाची फॅन नाही. उर्मिला म्हणाली, माझे म्हणणे आहे की कंगनावर खुप काही बोलले गेले आहे. आता तिला जास्त महत्व देण्याची गरज नाही. प्रत्येकाला टिका करण्याचा आधिकार आणि स्वातंत्र्य आहे, ती यासाठी स्वतंत्र आहे. मला स्पष्ट करायचे आहे की मी अद्याप इंटरव्ह्यूमध्ये तिच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

फिल्म इंडस्ट्री मुंबईतून युपीला घेऊन जाण्यावरून महाराष्ट्र आणि युपी सरकारमध्ये सुरू असलेल्या वादावर उर्मिला मातोंडकर म्हणाली, मुंबई आणि बॉलीवुड नसांनी जोडले गलेले आहे आणि त्यास मुंबईपासून वेगळे करता येणार नाही. मला वाटत नाही मुंबई आणि बॉलीवुड वेगळे करता येईल. मला विश्वास आहे यूपी फिल्म सिटी एक चांगला प्रोजेक्ट होईल.

You might also like