BIS ची अधिसूचना जारी ! 1 जूननंतर हॉलमार्कशिवाय सोन्याची विक्री नाहीच, केवळ 3 दर्जेदार सोन्याचे दागिने विकले जाणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. हॉलमार्क अर्थात दागिने खरेदी करताना त्याची शुद्धता व वजन अत्यावश्यक असते. तर १ जून २०२१ नंतर हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकले जाऊ शकत नाहीत. केंद्र सरकारच्या अखत्यारितील ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड (बीआयएस) ने सर्व नोंदणीकृत ज्वेलर्सना याबाबत निर्देश दिले आहेत. तर सोन्याची शुद्धता आता ३ श्रेणींमध्ये विभागली जाणार असून, अनुक्रमे २२, १८ आणि १४ कॅरेटचे टप्पे असतील. यामुळे ग्राहक आणि ज्वेलर्स दोघांनाही याचा फायदा होणार आहे. अशी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

ज्वेलर्स संघटनेच्या मागणीनुसार ती मुदत १ जूनपर्यंत वाढवली –
सोन्यासाठी Hallmarking त्याच्या शुद्धतेचे वैशिष्ट्य आहे. आता ते आवश्यक नाही. अगोदर त्याची अंतिम मुदत १५ जानेवारी २०२१ होती. तर ज्वेलर्स संघटनेच्या मागणीनुसार ही मुदत वाढवून १ जून २०२१ पर्यंत करण्यात आली. भारत मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करतो आणि ते वापरतोही. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत दरवर्षी जवळजवळ ७०० ते ८०० टन सोन्याची आयात करतो. ज्वेलरी हॉलमार्किंगच्या प्रक्रियेत ज्वेलर्स BIS च्या A आणि H सेंटरमध्ये दागिने ठेवतात आणि तिची गुणवत्ता तेथे तपासतात.

घरूनही करता येणार बीआयएस नोंदणी –
BIS कडे नोंदणी प्रक्रिया ज्वेलर्ससाठी अधिक सोपी केली गेली आहे. हे काम आता घरूनही करता येईल, यासाठी www.manakonline.in या संकेतस्थळावर जाऊन, जे कागदपत्रे सांगितले आहे, ती सबमिट करून, नोंदणी फी जमा करावी लागेल. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जदार BIS चा नोंदणीकृत ज्वेलर्स होतो.

किती आहे BIS नोंदणी फी ?
BIS नोंदणी फीसुद्धा खूप कमी ठेवण्यात आली आहे. जर ज्वेलर्सची उलाढाल ५ कोटींपेक्षा कमी असेल तर यासाठी नोंदणी फी ७५०० रुपये आहे. ५ कोटी ते २५ कोटी दरम्यानच्या उलाढाल असल्यास नोंदणी फी वर्षातील १५ हजार रुपये आणि २५ कोटी असू शकते, तर जास्त ज्वेलर्सच्या उलाढालीसाठी नोंदणी फी ४० हजार रुपये आहे. जर ज्वेलर्सची उलाढाल १०० कोटींच्या पुढे असेल तर नोंदणी फी ८० हजार रुपये आहे.