महिलेचा खून करून प्रेत पोत्यामध्ये भरून नदीत फेकले

दौंड : पाेलीसनामा ऑनलाईन

महिलेचा खून करून तिचे प्रेत पोत्यामध्ये भरून ते दौंड तालुक्यातील पारगाव येथील नदी पात्रामध्ये आणून टाकल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री उघडकीस आली असून हि अज्ञात महिला कोण आहे व तिला कुणी व का मारले असेल याबाबत  पारगाव परिसरात चर्चेला उधाण आले आहे.


मिळालेल्या अधिक माहिती नुसार बुधवार दिनांक १२/०९/२०१८ रोजी रात्री ९:३० वा.चे सुमारास पारगाव या गावाच्या हद्दीत भिमा नदीच्या पात्राच्या कडेला शिवरकर यांचे विद्युत मोटारीचे जवळ एक २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका अनोळखी महीलेचा मृतदेह देह आढळून आला. या महिलेस  कोणीतरी अज्ञात इसमांनी तिचा गळा दाबुन तिला जिवे ठार मारून तिचे प्रेत सुती पोत्यामध्ये भरून पोत्याचे तोंड दोरीने बांधून टाकुन दिलेले स्थितीतआढळून आले आहे.

या महीलेच्या अंगावर पोपटी रंगाचा टाॅप व पांढऱ्या रंगाचा कुर्ता असुन दोन्ही हातात पिवळसर रंगाच्या कचाकड्याच्या बांगड्या व पायात जोडवी आहेत. हि महिला कोण आहे व तिचा खून कुणी व कोणत्या कारणासाठी केला याबाबत यवत पोलीस तपास करत आहेत.
सदर मयत महीलेबाबत काही माहीती मिळाल्यास खालील मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन यवत पोलिसांनी केले असून याबाबत माहीती देणाऱ्या इसमाचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे.

१) पो.नि.बंडगर
मो.नं. ९५९४७८८४८४
२) सपोनी कानगुडे
मो.नं. ७३७८३०५३६४
३) दिपक पालके
८८०५४१३१००
४)यवत पोलीस स्टेशन
०२११९-२७४२३३

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.