पत्नीची हत्या करून ‘बॉडी’ स्कूटीवर ठेऊन धरणात फेकण्यासाठी जात होता पती, ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडलं

गुजरात : वृत्तसंस्था – गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील पालिताना शहरात एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली. त्यानंतर, तिचा मृतदेह लपविण्यासाठी स्कूटीवर टाकून नेत होता. मग स्कूटी घेऊन तो धरणाच्या दिशेने निघाला. जाताना जेव्हा लोकांनी ते पाहिले तेव्हा त्यांना या गुन्ह्याचा संशय आला. त्यानंतर लोक त्याच्यामागे गेले. नंतर त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

नगर पोलिस अधिकारी म्हणाले की, खून करणाऱ्या नवऱ्याला जागेवरच अटक करण्यात आली आहे. त्याचवेळी, त्याच्या पत्नीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. घरगुती भांडणानंतर रविवारी ही घटना घडली. पत्नीचा जीव घेतल्यानंतर नवऱ्याने तिचा मृतदेह अ‍ॅक्टिव्हावर ठेऊन धरणात टाकण्यासाठी जात होता.

जाताना गावकऱ्यांनी पाठलाग पाहून नवऱ्याला रंगेहाथ पकडले. या घटनेचे वर्णन करीत रोहिशाली गावातील एका व्यक्तीने सांगितले की, आम्ही त्या गावच्या चौकाजवळ बसलो होतो तेव्हा आम्हाला आढळले की त्या महिलेचा मृतदेह त्या व्यक्तीच्या अ‍ॅक्टिव्हावर लटकलेला होता. हे पाहिल्यावर आमच्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे आणि जेव्हा त्याने त्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने अ‍ॅक्टिव्हाचा वेग वाढविला. त्यानंतर अनेकांनी त्यांचा पाठलाग करुन दुचाकीवरून त्याला पकडले.

या घटनेमागील कारण पती-पत्नीमधील घरगुती भांडण असल्याचे सांगितले आहे. पालीताना येथील सिंधी छावणीत राहणारा अमित मथुरादास हेमानानी असे आरोपीचे नाव आहे. काही कारणावरून त्याचे पत्नी नयनाबेनशी बराच दिवसापासून भांडण सुरू होते. रविवारी अमितने नयनाचा गळा आवळून खून केला.