आपल्या नागरिकांना वुहानमध्ये मरण्यासाठी सोडल्यानंतर आता चीनसमोर ‘हात’ पसरतोय पाकिस्तान

नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था – रविवारी पाकिस्तानने सांगितले की, कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी त्यांना चीन या मित्रदेशाकडून एक हजार किट मिळले आहेत. ज्यामुळे या आजराशी लढण्यासाठी त्यांची क्षमता वाढेल. पंतप्रधान इम्रान खान यांचे आरोग्यविषयक विशेष सल्लागार जफर मिर्झा यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. पाकिस्तानने वुहानमध्ये अडकलेल्या आपल्या देशातील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी नकार दिला होता.

आतापर्यंत कोणालाही कोरोना संक्रमण न झाल्याचा दावा –
जफर मिर्झा यांनी ट्विट केले आहे त्यामध्ये ते म्हणतात, आता आमच्याकडे देखील कोरोना व्हायरस तपासण्याची क्षमता आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्याकडे एक हजार किट पोहचले आहेत ज्यामुळे कोरोनाशी लढण्यास मदत मिळेल. तसेच आतापर्यंत एकही नागरिक यामुळे संक्रमित झालेला नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.

चीनमध्ये अडकले आहेत 20 हजार पाकिस्तानी विद्यार्थी –
ते म्हणाले की, सुरुवातीला संशयिताची चौकशी इस्लामाबादमधील एनआयएच येथे केली जाईल आणि नंतर देशाच्या इतर भागात देखील सुविधा वाढविण्यात येईल. चीनमध्ये 28,000 हून अधिक पाकिस्तानी विद्यार्थी उपस्थित आहेत, त्यापैकी 500 विद्यार्थी सर्वाधिक प्रभाव असलेल्या वुहान शहरात आहेत.

विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्याने पाकवर टीका –
चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 300 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस हि आकडेवारी वाढतच चालली आहे. अशात भारताने वुहान येथे अडकलेल्या आपल्या 647 नागरिकांना स्पेशल विमान पाठवून परत बोलावून घेतले आहे. मात्र पाकिस्तानमधील हजारो विद्यार्थी अजूनही त्या ठिकाणी अडकलेले आहेत. ते परत पाकिस्तानमध्ये येण्यासाठी मदत मागत आहेत मात्र इम्रान खान यांनी त्यांना मदत करण्यास नकार दिल्याने सोशल मीडियावर पाकिस्तानला टीकेला जामोरे जावे लागत आहे.

सरकारचे म्हणणे आहे की, तिकडे चीनमध्ये त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. मात्र पाकिस्तानातील त्या विद्यार्थ्यांचे कुटुंबीय त्यांना पाकिस्तानात परत आणण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत. परंतु सरकार त्यांचे कहीही ऐकून घ्यायला तयार नाही. त्यांना तिकडून इकडे आणणे यामध्ये धोका असल्याचे सरकारचे म्हणजे आहे.