लॉकडाऊन संपल्यास वाढणार नोकर्‍यांची संधी, ‘या’ सेक्टरमध्ये काम करणार्‍यांना मिळणार मोठं काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   जगासह देशातही कोरोनामुळे अनेक उद्योग, व्यावसाय ठप्पे झाले. अनेकांच्या नोकर्‍या गेल्या पण, आता यात हळूहळु सुधारणा होऊ लागली आहे. देशातील 21 सेक्टर्समधील 800 हून अधिक कंपन्यांवर नजर ठेवणारी ‘स्टाफिंग फर्म टीमलीज’च्या मते अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर रिक्रूटमेंट सेंटीमेंटमध्ये सुधारणा झालीय. कंपन्यांनी पुन्हा एकदा नोकर्‍या देण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे.

एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी हायरिंग इंटेंट 18 टक्के झाला असून जो मार्च ते जून या कालावधीमध्ये 11 टक्के होता. हायरिंग इंटेंट अशा कंपन्या किंवा एम्प्लॉयरची टक्केवारी आहे, जे ठराविक कालावधी दरम्यान नोकरभरती करतात. बेंगळुरूध्ये हायरिंग इंटेंट सर्वाधिक 21 टक्के आहे. दिल्लीमध्ये 19 टक्के, हैदराबादमध्ये 15 टक्के, चंदीगढमध्ये 15 टक्के तर कोलकाता आणि मुंबईमध्ये हा इंटेंट 12 टक्के आहे.

‘टीमलीज’च्या अहवालानुसार इतर देशांपेक्षा भारतामध्ये हायरिंगची परिस्थिती उत्तम आहे. कारण, अमेरिकेमध्ये ही आकडेवारी 8 टक्के, युरोपमध्ये 9 टक्के आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या संकटाआधी ही आकडेवारी अधिक होती.

सध्या भारत देशाची अर्थव्यवस्था रुळावर येण्याचा प्रयत्न करीत आहे. ऑक्टोबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत देशातील हायरिंग इंटेंट 96 टक्के होता. ‘टीमलीज’च्या संस्थापक रितुपर्णा चर्कवर्ती यांनी सांगितले की, जर मोठ्या शहरात लॉकडाऊन सुरू राहिला नाही तर या आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीमध्ये हायरिंग इंटेंट सातत्याने वाढेल.

कोरोनामुळे अनेक कंपन्यांनी कामगार कपात, कर्मचारी कपात धोरण अंवलंबले आहे. तर, काही कंपन्यांनी तर कर्मचार्‍यांचे पगार पन्नास टक्क्यापेक्षा आणखी कमी करून काम करण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे काम करणार्‍या कर्मचार्‍यांपुढे इतर खर्च कसा पेलणार? असा प्रश्न उद्भवत आहे. तर, काही कंपन्यांनी कर्मचार्‍यांना थेट दोन-तीन महिने सुट्टीवर पाठविले आहे. तसेच त्यांना पुन्हा नोकरीवर घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, त्या कर्मचार्‍यांना पुन्हा घेतले जाईल का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. तर नोकर्‍यांचे अपडेट देणार्‍या कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात नोकरी कपात केली आहे. त्यामुळे आता बेरोजगारांना नोकर्‍यांचे अपडेट देणार्‍या कंपन्या आता योग्य अपडेट देतील का? अशी शंका उपस्थित होत आहे.

यात स्थानिक स्तरापासून ते जागतिक स्तरापर्यंतच्या कंपन्या, उद्योग, व्यावसाय यांचा समावेश होत आहे. ज्या सरकारी नोकर्‍या आहेत त्यासाठी आवश्यक असणार्‍या परीक्षांचे अर्ज अनेकांने भरले आहेत. मात्र, त्याची परीक्षा कधी होणार? निकाल कधी लागणार? आणि त्यातील कितीजणांना निवडणार? या प्रक्रिया वेळखाऊ ठरत आहे. भारतात बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. इतर देशाप्रमाणे भारतात बेरोजगार भत्ता दिला जात नाही. त्यामुळे तरूण वर्गासह अनेकजण मिळेल ते काम करण्यासाठी आतुर असतात. आता लॉकडाऊननंतर मात्र, सर्व उद्योग, व्यावसाय आदी क्षेत्रांची नव्याने उभारणी होण्याचा प्रकार सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा नोकर भरती होईल,अशी आशा व्यक्त केली जात आहे.

या क्षेत्रामध्ये आहेत नोकरीची संधी :
-हेल्थकेअर अँड फार्मास्यूटिक्ल
-शिक्षण सुविधा
– ई-कॉमर्स
-टेक स्टार्टअप्स
-कृषि आणि एग्रो-केमिकल्स,
-आयटी आणि एफएमसीजी

या क्षेत्रांमध्ये नोकरभरतीच्या प्रक्रिया वेगाने होतील. या क्षेत्रात सर्व स्तरावर नोकरभरतीची शक्यता वर्तविली जात आहे. चक्रवर्ती यांच्या मते, आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या सहामाहीमध्ये हायरिंग प्रक्रिया आणखी वेगात होईल, ही बेरोजगारांसाठी दिलासादायक बाब आहे.