लव्ह झाल्यानंतर सेक्स अन् प्रेग्नंट ! महिला कॉन्स्टेबलची झाली फसवणूक, 4 वर्षात सगळचं संपलं

आजमगड : वृत्तसंस्था – प्रेमात धोका होणे हे काही नवीन नाही. असाच धोका प्रेमातच नाही तर, आर्थिक व्यवहारात सुद्धा एका महिला कॉन्स्टेबलला मिळाला आहे. एका अशिक्षित तरुणाने आपण बँक मॅनेजर असल्याचे खोटे सांगून महिला कॉन्स्टेबल सोबत लग्न करून चार वर्ष तो तिच्यासोबत राहिला, नंतर महिला गर्भवती राहिल्यावर त्याने कुटुंबीयासमोर तिला स्वीकारण्यास नकार दिला. आरोपीने महिलेकडून ४ लाख रुपये आणि एक चार चा की सुद्धा चोरली होती.

पत्नीने केली आत्महत्या
हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने आपल्या बाळासकट आपले जीवन संपवले. आत्महत्येनंतर पोलिसांनी तिचा मोबाईल तपासला असता , हा प्रकार समोर आला आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

चॅट हिस्ट्रीमुळे पोल खोल
महिले चे नाव पूजा सिंह असून, ती २०१८ च्या बॅचची महिला कॉन्स्टेबल होती. ती चंदौली चकिया ठाणे परिसरात शाहमद्पुर येथील रहिवासी होती. ती फेब्रुवारी 2019 पासून फूलपूर पोलीस ठाण्यात रुजू झाली होती. ती फूलपूर कस्बामधील स्टेट बँकेजवळ भाडेतत्वावर राहत होती. पूजाचा मृतदेह 7 फेब्रुवारी रोजी घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला होता. त्यावेळी पूजाचा मोबाइल स्विच ऑफ असल्या कारणाने पोलिसांना पुरावा सापडत नव्हता, परंतु तिच्या मोबाईलची चॅट हिस्ट्री वाचल्यावर हे सगळे प्रकरकन पोलिसांना कळले आणि त्यांनी आरोपीला अटक केली.

बँक मॅनेजरचा ड्रायव्हर होता आरोपी
एसपी नागेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या पीडितेच्या नवरा अविनाश कुमार वाराणसी येथील लंकेत राहणारा होता. आरोपी हा बँक मॅनेजर ची गाडी चालवायचा. वाराणसी मध्ये पूजा ४ वर्षांपूर्वी शिक्षण घेत होती, त्याच वेळी पुजाशी त्याची ओळख झाली. आपण स्वतः बँक मॅनेजर असल्याचे सांगून आरोपीने पूजाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले.

नंतर झालेल्या पोलीस भरतीमधून पूजा फुलपुर पोलीस ठाण्यात रुजू झाली. नंतर दोघांनी लग्नही केले. स्वत:ला अविनाशची पत्नी मानून पूजाने त्याला लोन घेऊन नवीन कार घेऊन दिली आणि पाच लाख रुपये पण दिले. लग्न झाल्यावर पूजा गर्भवती राहिली होती , पण आरोपीने तिला स्वीकारण्यास नकार दिल्याने पूजाने आपले जीवन आपल्या बाळासहित संपवले.