भाजपाला मोठा धक्का ! शिवसेनेनंतर ‘हे’ 2 मोठे मित्र पक्ष लढविणार स्वतंत्र निवडणुक

पाटणा : वृत्त संस्था – महाराष्ट्रात ३० वर्षापासून युती असलेल्या शिवसेनेबरोबरचा घरोबा संपल्यानंतर आता झारखंड विधानसभा निवडणुकीतही भाजपाला मोठा धक्का बसला आहे. बिहारमध्ये त्यांचा मित्रपक्ष असलेला व सत्तेत सहभागी असलेला लोकजनशक्ती पक्ष झारखंडमध्ये स्वतंत्रपणे निवडणुक लढविणार आहे.

राम विलास पासवान यांच्या लोक जनशक्तीबरोबर भाजपाची किमान दोन दशकाहून अधिक काळ युती आहे. मोदी यांच्या पहिल्या व दुसऱ्या मंत्रिमंडळातही राम विलास पासवान हे आता मंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये त्यांची भाजपाबरोबर युती होती.

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपाने लोकजनशक्ती पक्षाबरोबर युती करण्यास लोक जनशक्ती पक्ष युती करायला इच्छुक होता. पण भाजपाने त्यांच्याबरोबर युती करायला उत्सुकता दाखविली नाही. त्यामुळे लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी झारखंड विधानसभेच्या ५० जागा लढविण्याची घोषणा केली आहे.

दुसरीकडे बिहारमध्ये भाजपाबरोबर सत्तेत असलेल्या नितीन कुमार यांचा संयुक्त जनता दलानेही झारखंडमध्ये स्वबळावर निवडणुक लढविण्याचे जाहीर केले आहे. तर, झारखंडमध्ये भाजपाबरोबर असलेल्या एज एस सू या पक्षानेही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात उमेदवार उतरविण्याची एकतर्फी जाहीर केले आहे. त्यामुळे आता झारखंडमध्ये भाजपाच्या गोटातीलच सर्वच पक्ष भाजपाच्या विरोधात निवडणुक रिंगणात उतरले असल्याचे दिसून येत आहे.

Visit : Policenama.com