IPL : MS धोनीच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरु, ‘ही’ 4 नावे चर्चेत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी कोलकतामध्ये लिलाव सुरु आहे. पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धेत जवळ जवळ सर्वच संघांनी आपले मुख्य खेळाडू आधीच निश्चित केले आहेत. मुंबई इंडियन्स संघाने आत्तापर्यंत सर्वाधिक चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. तर चेन्नई सुपर किंग्जने महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली तीन वेळा आयपीएल चषक पटकावला आहे.

महेंद्र सिंह धोनी सध्या भारतीय संघाकडून खेळत नाही. यामुळे तो निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे धोनी टी-20 वर्ल्ड कप खेळणार का अशी देखील चर्चा सुरु आहे. मात्र, धोनी आयपीएलचा पुढील हंगाम नक्की खेळणार आहे. महेंद्र सिंह धोनी 2008 पासून चेन्नई संघाचा कर्णधार आहे. पण 2020 नंतर तो क्रिकेट खळणार का याबाबत शंका आहे. म्हणूनच धोनीने पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल स्पर्धेनंतर निवृत्ती घेतल्यास चेन्नई संघाचे कोण नेतृत्व करणाऱ्याचा शोध आत्तापासूनच सुरु झाला आहे.

चेन्नई संघाकडून संघात खेळणाऱ्या खेळाडूंचा कर्णधार म्हणून विचार केला जाऊ शकतो. यामध्ये सुरेश रैना याचे नाव आघाडीवर आहे. सुरेश रैना हा भारतीय संघातील मधल्या फळीतील स्टार खेळाडू आहे. त्याने अनेक वेळा चेन्नईला एकहाती सामना जिंकून दिला आहे. रैना पाठोपाठ चेन्नई संघाचे नेतृत्व हरभजन सिंग करु शकतो. गेल्या दोन वर्षापासून हरभजन चेन्नईकडून खेळत आहे. त्यापूर्वी तो मुंबई संघाकडून खेळत होता. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2011 मध्ये टी-20 चा चषक पटकावला होता. एवढेच नाही तर तीन वेळा आयपीएल विजेत्या संघातून तो खेळला आहे.

परदेशी खेळाडूंचा विचार केल्यास चेन्नई संघाचे नेतृत्व आफ्रिकेचा फाफ डु प्लेसी हा खेळाडू धोनीची जागा घेऊ शकतो. त्याची कामगिरी आणि कर्णधारपदाचा अनुभव पाहता डु प्लेसी धोनीचा उत्तराधिकारी होऊ शकतो. डु प्लेसी नंतर शेन वॉटसन याचे नाव देखील चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू वॉटसनकडे टी-20 स्पर्धेचा मोठा अनुभव आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/