Video : ब्रेकअप झाल्यानंतर अनेक वर्षांनंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफ पुन्हा आले एकत्र

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हे दोघे ब्रेकअपच्या अनेक वर्षानंतर एकत्र आले आहेत. दोघे एका जाहिरातीमध्ये काम केले असून त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांना एकत्र पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

 

 

https://www.instagram.com/p/CJ928s_rGLM/?utm_source=ig_web_copy_link

 

 

 

रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्या प्रेमकथेची (love story) एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. ही जोडी त्यांच्या चाहत्यांची फेव्हरेट होती. 6 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघांनी ब्रेकअप केले होते. त्यांच्या ब्रेकअपमुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्या दोघांनी कधीच आपल्या ब्रेकअपचे कारण मीडियात सांगितले नाही. कतरिना आणि रणबीर यांच्या ब्रेकअपला जवळपास दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. आता ते पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. कतरिना कैफ आणि रणबीर कपूर या दोघांनी एका मोबाईल कंपनीची जाहिरात नुकतीच शूट केली आहे. या शूटवेळी त्यांनी बरीच धमाल केल्याचे व्हिडीओत पहायला मिळते आहे. टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर ही जाहिरात लवकरच पहायला मिळणार आहे.

रणबीर कपूर सध्या आलिया भटसोबत नात्यात असून ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावताना दिसतात. पण, त्यांनी नात्याबद्दल खुलासा केला नाही. नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनसाठी रणबीर आणि आलिया त्यांच्या फॅमिलीसोबत रणथंबौर येथे गेले होते. तर कतरिना कैफ अभिनेता विकी कौशलला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. न्यू ईअरच्या पहिल्या दिवशी कतरिनाशिवाय तिची बहीण इसाबेलनेही अलिबाग व्हॅकेशनचे फोटो शेअर केलेत. विकीनेसुद्धा भाऊ सनीसोबतचे फोटो पोस्ट केलेत. या फोटोतील स्विमिंग पूल आणि सेम बॅकग्राऊंड पाहून विकी, कॅट, इसाबेल आणि सनी हे चौघे अलिबागला एकत्र होते, याचा आणखी एक पुरावा मिळाला. ‘कॉफी विद करण’या शोमध्ये विकीने कतरिनाला डेट करत असल्याच्या बातम्या नाकारल्या होत्या. कतरिना मला आवडते. पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असे तो म्हणाला होता.