धक्कादायक ! लग्‍नानंतरही ‘या’ क्रिकेटपटूचं ७ जणींशी ‘लफड’, बायकोसमोरच ‘गोप्यस्फोट’ केल्याने खळबळ

नवी दिल्ल्ली : वृत्तसंस्था – अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे अफेयर्स किंवा त्यांच्यावर आपल्या बायकोला फसवल्याचे आरोप केले जातात. जगभरात विविध खेळांमधील खेळाडूंवर अशा प्रकारचे आरोप याआधी देखील झाले आहेत. त्यामुळे खेळाडूंवर आरोप होण्याचे प्रकार जगभरात काही नवीन नाही, मात्र काही खेळाडू याचा उघडपणे स्वीकार करतात तर काही खेळाडू हे मीडिया आणि आपल्या चाहत्यांपासून लपवून ठेवतात. मात्र एका माजी क्रिकेटपटूने खुलासा करताना धक्कादायक विधान केले आहे.

एका खासगी वाहिनीच्या मुलाखतीमध्ये त्याला आणि त्याच्या पत्नीला मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्याला अफेयर्सविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्याने कोणतीही भीती न बाळगता आपल्या बायकोसमोरच आपल्या अफेयर्सची कबुली दिली. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही न लपवता लग्नानंतर देखील माझे सात अफेयर्स झाल्याची कबुली त्याने दिली.

त्याचबरोबर ही अफेयर्स एका बाजीने नव्हती तर दोन्ही बाजूने होतो असं धक्कादायक खुलासा केला आहे. त्याचबरोबर या अफेयर्समध्ये प्रत्येकाची वेगळी भूमिका होती, असेदेखील त्याने स्पष्ट केले. तर हा क्रिकेटपटू कोण ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा क्रिकेटपटू सध्या कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळत नसून त्याने निवृत्ती स्वीकारलेली आहे. हा खेळाडू पाकिस्तानचा असून त्याचे नाव अब्दूल रझाक असे आहे. आपल्या कामगिरीने त्याने अनेकदा संघाला संकटातून बाहेर काढले आहे. त्यामुळे आता त्याच्या या वक्तव्यावर बाकी स्तरातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे आहे.

 घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like