रणवीर लग्नानंतर दीपिकाच्या घरी राहायला जाणार

मुंबई : वृत्तसंस्था –  बॉडीवूड मधील सगळ्यात गजलेले जोडपे म्हणून रणवीर आणि दीपिका यांच्या जोडीकडे पहिले जाते. त्यांच्या लग्नाची सध्या धामधूम सुरु असून दीपिका आणि रणवीर  हे येत्या १५ तारखेला विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. दीपिका आणि रणवीर विवाहबद्ध झाल्यानंतर पुरेसा एकांत मिळावा यासाठी त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यांना पसंद पडेल असे घर मिळाले नसल्याने दीपिका आणि रणवीर यांनी दीपिकाच्या घरी  राहण्याचा निर्णय घेतला आहे.

दीपिका आणि रणवीर यांच्या विवाह सोहळ्या बरोबर त्यांच्या वेगळे राहण्याची चर्चा जोरात चालू असल्याच्या बातम्या माध्यमात झळकत आहेत. दीपिका आणि रणवीर दीपिकाच्या घरी एकत्र  राहण्याचे महत्वाचे कारण हे कि दीपिका तिच्या घरी एकटी राहते तर रणवीर त्याच्या परिवारा सोबत राहतो त्यामुळे त्यांनी एकत्रित राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते आहे. तसेच दीपिकाचे घर दीपिकाने अनेक वर्षांच्या कष्टाच्या पैशातून घेतले असल्यामुळे ते घर तिने सोडू  नये अथवा  विकू नये असे रणवीरला वाटते

अस जुळलं दीपिका आणि रणवीर 
बाजीराव मस्तानी आणि पद्मावत या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी दोघांच्या मध्ये जवळीकता वाढत घेली आणि आगामी याकाळात दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला . त्याच्या प्रेम प्रकरणाने बॉलीवूड जगतात मोठी चर्चा हि रंगली होती. परंतु रणवीर आणि दीपिकाचा जोडा हा दृष्ट लागण्या सारखा जोडा असल्याचे सर्वच लोक बोलू लागले.

असा होणार रणवीर आणि दीपिकाचा  विवाह सोहळा 

१४ नोव्हेंबरला दोघे पारंपारिक कोकणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. दीपिका कर्नाटकातील सारस्वत ब्राह्मण असून कोकणी तिची मातृभाषा आहे. रणवीर सिंग सिंधी असल्याने  १५ नोव्हेंबरला सिंधी पद्धतीने विवाह होणार आहे. इटलीत लेक कोमो येथे दोघ लग्न करतील अशी चर्चा आहे .तर एक डिसेंबर रोजी त्या दोघांचा मायदेशी स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला असून त्यांनी त्यादिवशी सर्व मित्रांना आणि आप्तजणांना स्नेहभोजनाचे आयोजन केले  आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us