‘आइस्क्रिम’ प्रेमीच्या खिशाला ‘कात्री’ लागणार, दूधानंतर आता आइस्क्रिम ‘महागणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दूधानंतर आता देशाभरात आइस्क्रिम महागणार आहे. आईस्क्रिम बनवणाऱ्या कंपन्यांन्या 8 ते 15 टक्के किंमती वाढण्याची शक्यता आहे. स्किम्ड मिल्क पावडरचे दर वाढणे आणि एकूण महागाईमुळे कंपन्या उत्पादनांचे भाव वाढवत आहेत.

संबंधित लोकांना सांगितले की गुजरात बेस्ड आइस्क्रिम बनवणारी कंपनी वाडीलाल आपल्या उत्पादनाच्या किंमतीत 8 ते 10 टक्के वाढ करणार आहे, तर अमूल 8 ते 9 टक्क्यांनी किंमती वाढवण्याची शक्यता आहे. अमूलने सांगितले की किंमतीतील वाढ दोन वर्षानंतर करण्यात आली आहे.

खरेदी महागणार –
कंपन्या पहिल्यांदाच या मूल्यातील वृद्धी एका हिशात लागू केली आहे आणि बाकी किंमत वाढ जानेवारी महिन्यात करेल. मदर डेअरीने किंमतीचा बोझा ग्राहकांवर टाकला आहे. मदर डेअरीचे प्रवक्तांनी सांगितले की उत्पादनातील खर्चात वाढ झाल्याने आम्ही जवळपास 3 – 5 टक्के वाढ करणार आहोत.

स्किम्ड मिल्क पावडरच्या किंमतीत वाढ –
मागील महिन्यात स्किम्ड मिल्क पावडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. मागील आठवड्यात सप्टेंबरमध्ये 230 रुपये प्रति किलो ग्रॅमच्या तुलनेत डिसेंबर 2019 मध्ये वाढून 330 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहे. यामुळे उत्पादन कंपन्यावर दबाव वाढत आहे.

मागील वर्षी एसएमपीची सरासरी किंमत 150 रुपये प्रति किलोग्रॅम होती. मागील 4-5 वर्षात सरासरी किंमतीत 180 रुपये 200 रुपये किलोग्रॅम होती. मागील वर्षी जानेवारी 2019 मध्ये किंमती 180 रुपयांनी वाढवून सध्या स्थितीत 330 रुपये किलोग्रॅम झाली.

दूधाच्या किंमती वाढल्या –
अमूल आणि मदर डेअरीच्या किंमतीत 2 ते 3 रुपये प्रति लीटरने वाढ झाली आहे. कंपन्याकडून सांगण्यात आले की दूधाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. विविध राज्यात दूधाच्या उत्पादनात कमी आली आहे. प्रतिकूल मान्सूनमुळे दूध उपलब्धता कमी झाली आहे. तसेच पशुचारा महागला आहे.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/