आईच्या मृत्यूनंतर कृतघ्न मुलींनी वडिलांना काढले घराबाहेर : पोलिसांचे कारवाईचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशात मुलींनी आपल्या पित्याला घराबाहेर काढल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कानपूरमधील गंगानगर येथील कृष्णाधार पाल या ७३ वर्षीय वृद्ध व्यक्तीला त्याच्या मुलींनी घराबाहेर काढून त्याच्या घरावर कब्जा केला आहे. कृष्णाधार पाल हे भारतीय वायुसेनेत वॉरंट ऑफिसर होते. परंतु आज त्यांना दारोदार ठोकर खात फिरावे लागत आहे.

त्याच्या दोन्ही मुलींनी आणि जावयांनी  त्यांच्या घरावर कब्जा केला असून सध्या त्यांच्याकडे निवारा देखील नाही. गुरुवारी त्यांनी यासंबंधी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असून पाच तारखेला त्यांच्या मुलींनी घराचे कुलूप तोडून ताबा मिळवला असून घरातील किंमती वस्तूंवर देखील त्यांनी डल्ला मारला आहे. त्यांनी दुसऱ्या दिवशी याविषयी पोलिसांत तक्रार दिली मात्र पोलिसांनी त्यांची नोंद घेतली नसल्याचा आरोप कृष्णाधार पाल यांनी केला आहे. त्यानंतर ते थेट पोलीस अधीक्षकांकडे गेले आणि आपली व्यथा त्यांना सांगितली.

अनेकांचे वाचवले प्राण

कृष्णाधार पाल यांनी सांगितले कि, त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या युद्धात सहभाग नोंदविला आहे. त्यावेळी त्यांनी अनेक जखमी सैनिकांना दवाखाण्यात दाखल केले होते.

आरोग्यविषयक वृत्त