Dnyandev Wankhede | मलिकांच्या नव्या ट्विटनंतर, ज्ञानदेव वानखेडेंनी ‘हे’ फोटो शेअर करुन केले स्पष्टीकरण; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Dnyandev Wankhede | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंंतर राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक आरोप करत आहेत. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मलिकांनी मध्यरात्रीच आणखी एक ट्विट (Tweet) करत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मलिकांनी समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा दावा केला. त्यासंदर्भातले काही पुरावेही त्यांनी दिले. परंतु, हा आरोप वानखेडे यांनी फेटाळला. या दाव्यानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी काही फोटो शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे.

 

ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांनी समीर वानखेडे यांचे फोटो शेअर करुन हिंदू असल्याचा पुरावा दिला आहे.
त्यात पहिला फोटो समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर-वानखेडे (Kranti Redkar-Wankhede) यांच्या लग्नातला आहे.
दुसऱ्या फोटोत समीर वानखेडे सत्यनारायण पूजेच्या नमस्कार करतानाचा आहे.
तसेच, तिसऱ्या फोटोत समीर वानखेडे कसली तरी पूजा करत असताना दिसून येत आहेत. असे तीन फोटो शेअर केलेत.
तसेच, ज्ञानदेव वानखेडे यांनी हे फोटो शेअर करुन आम्ही हिंदू धर्माचे पालन करतो असं म्हटलं आहे.

 

नवाब मलिकांचं ट्विट काय?

 

नवाब मलिक (Nawab Malik)यांनी आपल्या ट्विटरवरून समीर वानखेडे यांचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये वानखेडे मुस्लीम वेशात दिसत आहेत.
हा फोटो ट्विट करत त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये नवाब मलिक म्हणाले की, ‘कबूल है, कबूल है, कबूल है…यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे? मलिक यांनी जो फोटो ट्विट केला आहे.
त्या फोटोत वानखेडे लग्नातील खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. तर त्यांच्या शेजारीच बसलेले एक गृहस्थ त्यांची काही कागदपत्रांवर सही घेताना दिसत आहेत.
हे दोघंही मुस्लीम पोशाखात दिसत आहेत. असं ट्विट मलिकांनी केलंय.

 

Web Title : after nawab malik new tweet dnyandev wankhede shared photos of sameer wankhede and made new revelation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anil Parab | शरद पवारांसोबत 4 तास चर्चा झाल्यानंतर विलीनीकरणाबाबत अनिल परबांची माहिती; म्हणाले…

Mansukh Hiren Murder Case | सचिन वाझेचा चौकशी समितीसमोर धक्कादायक खुलासा, म्हणाला – ‘त्या प्रकरणात मी फक्त प्यादा’

Maharashtra Primary Schools Reopen | ‘पहिलीपासून शाळा सुरु होणार, पण…’, राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती