धक्कादायक… दीड वर्षाच्या चिमुकलीसह पती, पत्नीची विष पिऊन नंतर झाडाला दोरीने फाशी लावूनआत्महत्या

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन

वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावातील एकाच कुटुंबातील तिघांनी विष घेऊन नंतर झाडाला दोरीने फाशी लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका दीड वर्षाच्या चिमुकलीचाही सहभाग आहे. त्यामुळे आर्वी येथील संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

अनिल नारायण वानखडे वय ३७, पत्नी स्वाती अनिल वानखडे, मुलगी आस्था वय दिड वर्ष असे आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर वृत असे की, आष्टी तालुक्यातील लहान आर्वी या गावातील ही घटना असुन आपल्या वडिलांशी झालेल्या वादातून काल संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास बाहेर जाऊन अनील यांनी विषारी आैषध विकत घेतलं.नंतर आपल्या पत्नी व मुलीसह स्वत: विष प्राशण करुन अप्पर वर्धा धरणाच्या परिसरात झाडाला दोरीने फाशी लावून आत्महत्या केली आहे. यामध्ये पती,पत्नी आणि मुलगी या तिघांचाही मृत्यू झाला. दरम्यान येथील स्थानिकांनी त्यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहिले आणि यासंदर्भात माहिती पोलीसांना दिली. दरम्यान या घटनेचा पोलीस पंचनामा करत आहेत. असे माहिती वरुन समजते.