‘एक देश एक निवडणुक’ नंतर आता ‘एक देश एक रेशन कार्ड’

दिल्ली : वृत्तसंस्था –  सलग दुसऱ्यांदा लोकसभेत बहुमत मिळाल्यानंतर मोदी सरकार नवनवीन योजना राबवून जनतेला उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. मागील कार्यकाळात नमो ॲप तसेच भीम ॲप नंतर आता केंद्र सरकार व्हाट्सॲप सारखे एक नवीन ‘ॲप आणणार आहे. त्यानंतर आता मोदी सरकार रेशन कार्ड मध्ये देखील बदल करण्याच्या विचारात आहे. एक देश एक निवडणुकीच्या धर्तीवर सरकार एक देश एक रेशन कार्ड योजना राबवणार असल्याचे समजत आहे. केंद्रीय खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी यासंदर्भात सांगितले कि, सरकार याबाबत गांभीर्याने विचार करत आहे.

रेशन कार्ड पोर्टेबिलिटी –

या सुविधेमध्ये रेशन कार्ड तुम्ही पोर्ट देखील करू शकता, यामुळे कोणत्याही प्रदेशात तुम्हाला रेशन कार्डवर मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. यासंदर्भात त्यांनी गुरुवारी सर्व राज्यांच्या खाद्य सचिव आणि सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये याविषयी चर्चा झाली आहे. यामध्ये केंद्र सरकारकडे या सर्व रेशन कार्ड धारकांची नोंद असणार आहे, ज्यामुळे भविष्यात दुबार नोंदणी किंवा फसवणूक टाळता येईल. त्याचबरोबर केंद्रीय खाद्य राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सर्व राज्यांना आपली रेशन कार्ड डिजिटल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अशा प्रकारे काम करेल व्यवस्था – 

या नवीन व्यवस्थेत तुम्ही पूर्ण देशभरात एकाच रेशन कार्डचा वापर करू शकता. यामुळे भविष्यात दुबार नोंदणी किंवा फसवणूक टाळता येईल. प्रत्येक रेशन कार्डला एक युनिक नंबर दिला जाईल. यामुळे तुम्ही डुप्लिकेट रेशन कार्ड तयार करू शकत नाही. त्यामुळे एकाच नावाने अनेक रेशन कार्ड बनवणाऱ्यांना चाप बसणार आहे. यामुळे तुम्ही कोणत्याही राज्यात नोकरीच्या निमित्ताने गेला तरी तुम्ही त्या राज्यात रेशन प्रणालीचा फायदा घेऊ शकता.

आरोग्यविषयक वृत्त – 

मुतखड्याच्या असह्य वेदना टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी

रोग प्रतिकारशक्ती दुबळी का होते ? जाणून घ्या

अर्धशिशी म्हणजे काय ? जाणून घ्या, करा हे उपाय

थायरॉइडने त्रस्त आहात ? घरगुती उपाय करून समस्या सोडवा