पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार संजय दत्त (Sanjay Dutt) यानं अलीकडेच कर्करोगावर मात केली आहे. यानंतर त्याचा लुक समोर आल्यानंतर फिटनेसबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. असंही सांगितलं गेलं होतं की, संजय दत्तच्या तब्येतीची काळजी घेता आता त्याच्या सिनेमात अॅक्शन सीन कमी असतील. कदाचित तो अॅक्शन सीन करू शकणार नाही असंही बोललं गेलं होतं. निर्मात्यांनाही तशीच भीती वाटत होती. आजवर त्यानं वाईट काळात कायमच स्वत:ला सिद्ध केलं आहे. पुन्हा एकदा त्यानं कमाल करून दाखवली आहे.
सजय दत्त सध्या आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देत आहे. सिनेमात तो कोणतीही तडजोड करायला तयार नाही. प्रत्येक सीनमध्ये तो जीव ओतून काम करतो. त्यामुळं त्याला अॅक्शन सीन करायला काहीच हरकत नाही.
केजीएफ 2 (K.G.F. Chapter 2) चा लिड अॅक्टर यश (Yash) यानं संजय दत्तचं खूप कौतुक केलं आहे. इतकी ऊर्जा असणारा दुसरा व्यक्ती मी पाहिला नाही. अॅक्शन सीनच्या माध्यमातून संजय दत्त स्क्रीन फोडून टाकेल.
एका वृत्तानुसार, निर्माते आता कोणताही सीन एडिट करणार नाहीत. त्यांचं म्हणणं आहे की, संजय दत्तनं खूप हिंमत दाखवली आहे. त्याला सगळे सीन करायचे आहेत. त्यामुळं आता अॅक्शन डोस कमी होणार नाही.
संजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच तो KGF चॅप्टर 2, सडक 2 आणि मुंबई सागा अशा काही सिनेमात काम करताना दिसणार आहेत. याशिवाय अजय देवगण स्टारर भुज द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमातही तो महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.