Video : अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर शायरीतून ‘निशाणा’, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. गृहमंत्र्यांनी महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्यास सचिन वाझेंना सांगितले होते तसे पूर्वे आपल्याकडे असल्याचे सिंग यांनी म्हंटल आहे. सिंग यांच्या आरोपानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी या प्रकारावरून सरकारला धरेवर धरलं असून अमृता फडणवीस यांनीही याप्रकरणी ट्विट केलंय.

ठाकरे सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, पोलीस दलात काही दिवसापासून अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. नुकतेच परमबीर सिंग यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत. डीजी दर्जाच्या अधिकाऱ्याने केलेले इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोपांमुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होत आहे. ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे, असं फडणवीस म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत अमृता फडणवीस यांनीही ट्विट केलंय.

वाझे प्रकरणात अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी ट्विट करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. “व्यवहार माझे, जबाबदार वाझे!, सांगा पाहू कोणकोणास म्हणाले”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर, परमबीरसिंग यांच्या पत्राचे वृत्त माध्यमांत झळकताच अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलंय..

बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,
बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?,
असे ट्विट अमृता यांनी केलंय. मुख्यमंत्री अन् गृहमंत्री यांच्याकडे अमृता यांच्या ट्विटचा रोख असल्याचं दिसून येतंय.

काय म्हणाले फडणवीस
परमबीर सिंग हे डीजी आहेत त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा काहीएक अधिकार नाही मुख्यमंत्र्यानी त्यांचा राजीनामा घ्यावा. त्याचबरोबर या प्रकरणाची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करावी. केंद्रीय यंत्रणेवर विश्वास नसल्यास न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. परमबीर सिंग यांनी त्यांच्या आरोपात संभाषणदेखील जोडलं असल्यानं आरोपांचं गांभीर्य वाढलं असून मुख्यमंत्री ठाकरेंनी अनेकदा दोषी असल्यास कारवाई करण्याची भाषा केली आहे. त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवावेत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

परमबीर सिंग यांचे आरोप
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल परमबीर सिंग यांनी पत्र लिहिले आहे. त्यामध्ये यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीच कल्पना दिली होती, असा दावा केला आहे.
वर्षा बंगल्यावर मार्चच्या मध्यावर मी तुम्हाला भेटण्यासाठी आलो. तिथे अँटिलिया प्रकरणाची पूर्ण माहिती देत असताना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दलही तुमच्या कानावर घातले होते. इतकेच नाही तर, देशमुखांच्या चुकीच्या कृतीची उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही माहिती दिली. खरेतर ही माहिती तिथे उपस्थित असलेल्या इतर मंत्र्यांना आधीच होती असे माझ्या लक्षात आले. गुन्हे गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे होते. गृहमंत्री देशमुख यांनी गेल्या काही महिन्यांत कित्येक वेळेस त्यांना त्यांच्या ज्ञानेश्वर निवासस्थानी बोलावून दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितले होते, असा आरोप सिंग यांनी पत्रात केलाय.