‘कोरोना’सोबतच्या लढ्यासाठी अमेरिकेला मिळाले आणखी एक शस्त्र, फायजरनंतर मॉडर्नाच्या कोरोना व्हॅक्सीनला मंजूरी

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना व्हायरसला तोंड देण्यासाठी व्हॅक्सीनच्या ट्रायल सुरू आहेत. या दरम्यान, दररोज सुमारे 3000 मृत्यू होत असलेल्या अमेरिकेने फायजरनंतर मॉडर्नाच्या कोरोना व्हॅक्सीनला सुद्धा मंजूरी दिली आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या एका पॅनलने मॉडर्नाच्या कोरोना व्हॅक्सीनच्या इमर्जन्सी वापराला मंजूरी दिली आहे. पॅनलने यास कोरोनाला तोंड देण्याचा दुसरा पर्याय म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मॉडर्ना व्हॅक्सीनचे वितरण तात्काळ प्रभावाने सुरू होईल.

यापूर्वी अमेरिकेत काही दिवसांपूर्वी फायजरने विकसित केलेल्या कोविड-19 व्हॅक्सीनच्या इमर्जन्सी वापराला मंजूरी दिली होती आणि लोकांना लस देण्यात येत आहे. कमी संख्येत उपलब्ध हे डोस बहुतांश आरोग्य कर्मचार्‍यांना देण्यात येत आहेत.

ही व्हॅक्सीन फायजर आणि जर्मनीच्या बायोएनटेकच्या व्हॅक्सीनशी मिळती-जुळती आहे. या व्हॅक्सीनवर करण्यात आलेल्या सुरूवातीच्या शोधानुसार, दोन्ही व्हॅक्सीन सुरक्षित आहेत. मात्र, मॉडर्ना व्हॅक्सीन साठा करण्यास सोपी आहे कारण ती फायजरप्रमाणे -75 डिग्री सेल्सियसमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही.

अमेरिकेत आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 3 लाख 12 हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. मागील बुधवारी एका दिवसात 3 हजार 600 लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाने जगभरात आतापर्यंत 17 लाख लोकांना जीव गमावला आहे.

फायजर आणि मॉडर्नाच्या देखभालीत फरक
फायजरच्या कोरोना व्हॅक्सीनचे डोस मायनस -75 डिग्री सेल्सियसमध्ये ठेवणे बंधनकारक आहे. हा डोस कोणत्याही व्हॅक्सीनच्या तुलनेत सुमारे 50 डिग्री जास्त थंड असणे आवश्यक आहे. व्हॅक्सीन संपण्यापूर्वी केवळ पाच दिवसांपर्यंत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येऊ शकते.फायजरची लस हॉस्पिटलशिवाय प्रमुख संस्थांसाठी जास्त वापरली जाऊ शकते. तर, मॉडर्नाची सर्वात महत्वाची बाब म्हणजे या लसीला सुपर-कोल्ड तापमानात ठेवण्याची गरज नाही. तो मायनस-20 डिग्री सेल्सियसवर घरातील फ्रीजरच्या तापमानात ठेवू शकता. लस संपण्यापूर्वी 30 दिवसांसाठी रेफ्रिजरेटरमध्ये सुद्धा ठेवता येते. मॉडर्नाची व्हॅक्सीन स्थानिक साखळी किंवा फार्मासिस्टसारख्या छोट्या सुविधांसाठी जास्त उपयोगी ठरू शकते.