PM मोदींच्या पहिल्याच दौऱ्यात बहरीन सरकारकडून 250 भारतीय कैद्यांची शिक्षा माफ, कुटुंबियांमध्ये आनंदोउत्सव

मनामा : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आखाती दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या आखाती दौऱ्या दरम्यान बहरीन सरकारने 250 भारतीय कैद्यांची शिक्षा माफ केली. बहरीन सरकारने सद्भावनेने भारतीय कैद्यांची शिक्षा माफ केली आहे. बहरीन सरकारच्या या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बहरीनचे शाह आणि पूर्ण शाही कुटुंबाचे अभार मानले आहेत. या संदर्भातले ट्विट पंतप्रधान कार्य़ालयाने केले आहे.

परदेशातील विविध देशात मिळून 8 हजार 189 भारतीय कैदी आहेत. यामध्ये सौदी अरबमध्ये सर्वाधिक 1 हजार 811 कैदी आहेत. मात्र, बहरीनमधील तुरुंगात किती भारतीय कैदी आहेत हे अद्याप समजू शकले नाही. पण तेथील नेतृत्वाने 250 भारतीय कैद्यांची शिक्षा माफ केली आहे. बहरीननंतर अमेरिकेमध्ये 1 हजार 392 कैदी आसल्याची आकडेवारी अधिकृत सुत्रांकडून देण्यात आली आहे.

आखाती देशांच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनामा येथे भगवा श्री कृष्णाचे 200 वर्ष जुने असलेल्या मंदिराच्या पुनर्निमितीसाठी प्रकल्पाचा शुभारंभ केला. यासाठी 42 लाख डॉलर्सचा खर्च येणार असून हे मंदिर 45 हजार क्वेअर फुट इतक्या जागेत उभारले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बहरीनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. मोदींनी बहरीनचे वली अहमद सलमान बिन हमाद बिन इसा अल खलीफा यांची भेट घेतली. य दोघांमध्ये झालेल्या चर्चेत दोन्ही देशांमध्ये मैत्री वाढवण्यासाठी चर्चा झाली. भारत आणि बहरीनमध्ये व्यापारी आणि संस्कृतीक आदान-प्रदान करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे.