PoK मध्ये भारतानं केलेल्या कारवाईमुळं इम्रान खान ‘गोत्यात’, 27 ऑक्टोबरला विरोधी पक्ष घेरावबंदी करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकव्याप्त काश्मीरमध्ये रविवारी भारतीय सैन्याने कारवाई केल्याने इमरान खान पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. भारताकडून होणाऱ्या सैनिकी कारवाया रोखण्यात इमरान खान अपयशी ठरल्याने विरोधी पक्ष 27 ऑक्टोबरपासून इस्लामाबादमध्ये पंतप्रधान इमरान यांना घेराव घालण्याच्या प्रयत्न करत आहेत. यात एकूण 10 लाख लोक सहभागी होणार आहेत. असे झाल्यास पाकमधील इमरान खान सरकारच्या विरोधात हे सर्वोत मोठे आंदोलन ठरेल.

भारतीय सैन्याने शनिवारी पाकिस्तानच्या ताब्यातील पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या 3 दहशतवादी तळ आर्टिलरी गनने उधवस्त केलेे. या कारवाईमध्ये पाकिस्तानाचे 10 सैनिक मारल्या गेले. यात बरेच दहशतवादी मारल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सेनेचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितले की सैन्य पाकिस्तानाच्या कारवायावर पुन्हा असेच प्रतिउत्तर देत राहिल. याच मुद्यावर पाकिस्तानात विरोधक पंतप्रधान इमरान खान यांच्या विरोधात उतरले आहेत.

एका आहवालानुसार नवाज शरीफ यांचा पीएमएलएन, आसिफ अली जरदारी यांचा पीपीपी आणि मौलाना फजलू रहमान यांचा जमीयत उलेमा इस्माल हे पक्ष 27 ऑक्टोबरला इमरान खान यांना घेराव घालेल आणि त्यांच्याकडून विविध प्रश्नांची उत्तरे मागतील. या पक्षांच्या नेत्यांनी इमरान खान यांनी मतदानप्रक्रियेत गडबड केल्याचा आरोप देखील लावला आहे. त्यांच्या मते इमरान खान यांनी गुप्त तंत्रज्ञानाचा वापर करुन मतदान प्रक्रियेत गडबड केली आणि त्यामुळेच ते सत्तेत आले.

या आहवालाच्या मते प्रशासन, इमरान खान आणि त्यांचे मंत्री या होणाऱ्या विरोधामुळे चिंतित आहेत, या विरोधाला रोखण्यासाठी इमरान खान सरकार विरोधकांची समजूत काढत आहे. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानात काश्मीर मुद्दा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. इमरान खान त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आझादी मोर्चा काढण्यासाठी विनंती करत आहेत. परंतू रविवारी पाकव्याप्त काश्मीरात भारतीय सैन्याने कारवाई केल्याने पाकिस्तानातून जनतेचे लक्ष आझादी मोर्चापासून विचलित झाले आहे.

6 – 10 पाक सैनिकांना मारले –
भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल बिपिन रावत म्हणाले की जम्मू काश्मीरच्या तंगधार सेक्टरच्या दुसऱ्या बाजूला सैन्याद्वारे कारवाई करण्यात आली त्यात 10 पाकिस्तानी सैनिकांना मारण्यात आले तर 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like