पूनम पांडेला जामीन मिळताच मिलिंद सोमन विरोधात पोलिसात तक्रार ! Nude फोटोमुळं अभिनेता अडचणीत

पणजी : वृत्त संस्था – न्यूड फोटो आणि व्हिडीओंमुळं अ‍ॅक्ट्रेस पूनम पांडे (Poonam Pandey) ही अडचणीत सापडली होती. यानंतर आता न्यूड फोटोमुळं अभिनेता मिलिंद सोमन (Milind Soman) हादेखील अडचणीत सापडला आहे. एकीकडे पूनम पांडेला अटकेनंतर जामीन मिळाला आहे तर दुसरीकडे आता मिलिंद सोमन विरोधात पोलिसात तक्रार दखल करण्यात आली आहे. गोव्यातील बीचवर न्यूड फोटो काढून तो आपल्या सोशल मीडियावर शेअर केल्या प्रकरणी मिलिंद सोमन विरोधात गोवा पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

बॉलिवूड स्टार, फिटनेस फ्रिक आणि पहिला पुरुष सुपरमॉडेल म्हणून ओळखला जाणारा मिलिंद सोमन यानं नुकताच त्याचा 55 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यानं सोशलवरून गोव्यात समुद्रकिनारी धावताना न्यूड फोटो शेअर करून चाहत्यांना चांगलंच सरप्राईज दिलं. यानंतर आता गोवा सुरक्षा मंचानं वास्को पोलिसात मिलिंद सोमन विरोधात तक्रार दाखल केली आहे.

आरएसएसचे माजी सरसंघचालक आणि गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख सुभाष वेलिंगकर (Subhash Velingkar) यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, अशा स्वैर वागण्यानं आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असणाऱ्या गोव्याची बदनामी होत आहे.

गोव्यात न्युड व्हिडीओ शुट केल्यानंतर अभिनेत्री पूनम पांडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर मिलिंद सोमनलाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जाऊ लागलं. फिल्ममेकर अपूर्व असरानी यानंही पोस्ट शेअर करत पूनम पांडेला पाठींबा दर्शवत ट्विट केलं होतं.

गोव्यात न्यूड व्हिडीओ शूट केल्यानंतर अभिनेत्री पूनम पांडेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर मिलिंद सोमणलाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जाऊ लागलं. फिल्ममेकर अपूर्व असरानी याने देखील पोस्ट शेअर कर पूनम पांडेला पाठिंबा दर्शवतत ट्वीट केलं होतं.