राहुल बजाज पाठोपाठ ‘या’ उद्योगपतीने केंद्र सरकारला सुनावलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्योगपती राहुल बजाज यांनी उद्योगपती सरकारला घाबरतात अशा शब्दात केंद्र सरकारवर टिका केली होती. त्यानंतर आता उद्योगपती किरण मुजुमदार शॉ यांनी आपले म्हणणे मांडले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राहुल बजाज यांनी सर्व कॉर्पोरेट जगताचे मत बोलून दाखविले आहे. पण, सरकारवर टिका केली तर त्याला देशविरोधी म्हणून काय पाहिले जाते. सरकारला टिका पसंत नाही. सरकारने नेहमी सर्व लोकांच्या सूचना ऐकण्यास तयार असले पाहिजे. केवळ आपल्या समर्थकांच्या सूचना नाही. अमित शहा यांनी राहुल बजाज यांच्या टिकेवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली असली तरी भाजपाचे वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर टिका करु लागले आहेत, हे बरोबर नाही.

६६ वर्षाच्या किरण मुजुमदार शॉ यांनी सांगितले की, सध्या आर्थिक मंदी आहे. अर्थव्यवस्थेला पुर्नजीवत केले पाहिजे. ते राजनैतिक प्रवचन होता कामा नये. त्यातून सावरण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी सरकारने सर्वांच्या सूचनांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. परतु, ते केवळ त्यांची प्रशंसा करणाऱ्या समर्थक आहेत, त्यांचेच म्हणणे ऐकते. दुसऱ्यांना राष्ट्रविरोधी किंवा सरकार विरोधी मानून त्यांच्या सुचनांचा विचारही करत नाही.

राहुल बजाज यांच्या विचारावर बोलताना त्यांनी सांगितले की, राहुल बजाज यांनी कॉर्पोरेट इंडियाचा आवाज बोलून दाखविला. त्यांच्यावर कोणी टिका न करता त्यांचा अर्थ समजून घेतला पाहिजे, असे आपल्याला वाटत असल्याचे शॉ यांनी सांगितले.

Visit : policenama.com